EPFO Good News पीएफ खातेदारांसाठी मोठी बातमी ! पीएफ व्याजदराबाबत मोठा निर्णय !

देशभरातील 7.5 कोटी पीएफ खातेदारांसाठी EPFO ने मोठा दिलासा; २०२६ या आर्थिक वर्षासाठी व्याजदर ८.२५% जाहीर

EPFO Good News For PF Account Holder's

सोमवार २ मार्च २०२६ रोजी केंद्रीय श्रम व रोजगार आणि युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाची (CBT EPFO) 239 वी बैठक पार पडली.


या बैठकीत केंद्रीय विश्वस्त मंडळा च्यामाध्यमातून (EPFO CBT) 2025-26 या आर्थिक वर्षासाठी पीएफ खात्यावरील व्याजदर वार्षिक 8.25% ठेवण्यास मंजुरी दिली आहे.

लवकरच केंद्र सरकार या व्याजदराची अधिकृत सूचना जारी करेल व त्यानंतर EPFO च्या माध्यमातून पीएफ खातेदारांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा केली जाईल. यामुळे पीएफ खातेदारांना एक मोठा दिलासा मिळणार आहे.


याचबरोबर ज्या पीएफ खात्यात ३ वर्षे अर्थात ३६ महिने पीएफ जमा केला जात नाही अशी PF खाती बंद केली जातात. अशा बंद असलेल्या १,००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी दावे न केलेल्या शिल्लक असलेल्या निष्क्रिय ईपीएफओ खात्यांमध्ये दाव्याचे निपटारा स्वयंचलितपणे सुरू करण्यासाठी संचालक मंडळाने एक पायलट प्रोजेक्ट मंजूर केला आहे.

या मोहिमेत पहिल्या टप्प्यात, सुमारे १.३३ लाख १००० पेक्षा कमी रक्कम असलेल्या बंद खात्यांतील रक्कम ही त्या सदस्यांच्या आधार-सीड आणि ईपीएफओ-लिंक्ड बँक खात्यांमध्ये थेट जमा केली जाईल, 


या प्रक्रियेत नवीन दावे किंवा कागदपत्रांची आवश्यकता पडणारी नाही यामुळे ही प्रक्रिया सुलभ होईल आणि सदस्यांना त्यांचे देय जलद मिळण्यास मदत होणार आहे.

या पायलट प्रोजेक्टच्या यशावर लक्षात घेऊन पुढील टप्प्यात ही सुविधा १,००० रुपयांपेक्षा जास्त शिल्लक असलेल्या खात्यां साठी लागू करण्यात येणार आहे.




या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map