या शेतकऱ्यांना ₹२२,५०० हेक्टरी, फळपीक विमा ही मिळणार || Amba Kaju Nuksan Bharpai
नैसर्गिक आपत्ती मुळे बाधित आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ₹२२,५०० भरपाई; तर फळपीक विमा ही मिळणार
Amba Kaju Nuksan Bharpai 2026
राज्यात चालू वर्षात झालेल्या वातावरणातील बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या अंबा आणि काजू पिकाला खूप कमी प्रमाणात फळधारणा झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या नुकसानी संदर्भात पावसाळी अधिवेशनामध्ये विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आला आणि याच पार्श्वभूमीवर कृषीमंत्र्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाई सह फळ पिक विमा मंजूर केला असल्याची माहिती आज सभागृहाला दिली.
यापूर्वी विविध नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणातील या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी, झालेल्या नुकसानी संदर्भात कोकणातील दोन्ही सभागृहातील लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसमवेत 17 मार्च 2026 रोजी बैठक झाली होती.
या बैठकीनंतर शासनाने क्षेत्रीय पातळीवर झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल, कृषी विभाग व डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून मागविला आहे. सुकृत दर्शनी राज्यात आंबा काजू या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.
सन २०२५-२६ मध्ये कोकणात पालघर ठाणे, रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये १,२४,५७१ हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे.
प्रधानमंत्री फळ पीक विमा योजना आंबिया बहार मध्ये आंबा या पिकासाठी एकूण 302 महसूल मंडळ अधिसूचित करण्यात आलेली असून 35,580 हेक्टर क्षेत्रासाठी 80418 शेतकऱ्यांनी हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभाग घेऊन आंबा पिकाचा विमा उतरवला आहे.
आंबा पिकासाठी सद्यस्थितीत प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनाअंतर्गत नुकसानीचे कमी तापमान व जास्त तापमान हे ट्रिगर लागू झालेले आहेत.
यात कमी तापमान या ट्रिगर साठी कोकणातील साधारण 302 पैकी 155 महसूल मंडळात नुकसान भरपाई देय झाली आहे . कमी तापमानासाठी ६०७१ ते ३४००० रुपये प्रति हेक्टर अशी नुकसान भरपाई मिळते तर जास्त तापमानासाठी १७१७१ ते ६८००० रुपये प्रति हेक्टर इतकी नुकसान भरपाई मिळणार आहे.
कोकणातील 71 हजार 654 शेतकऱ्यांना 217 कोटी रुपयांचा फळ पिक विमा देखील मिळणार आहे ज्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 36 हजार 609 शेतकऱ्यांना 90 कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 85 कोटी 82 लाख रुपयांचा फळ पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे पालघर जिल्ह्यातील 3628 शेतकऱ्यांना सात कोटी 69 लाख रुपयाचा रायगड जिल्ह्यातील 719 शेतकऱ्यांना 26 कोटी 79 लाख रुपयाचा तर ठाणे जिल्ह्यातील 2301 शेतकऱ्यांना सात कोटी 37 लाख रुपयांच फळ पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.
फळपीक विमा योजनेअंतर्गत काजू साठी कमी तापमान हा ट्रिगर लागू झाला असून त्यासाठी कोकणातील साधारण 198 पैकी 150 महसूल मंडळात नुकसान भरपाई देय झाली आहे ही नुकसान भरपाई कमी तापमानासाठी कमीत कमी 16800 तर जास्तीत जास्त 42 हजार रुपये प्रति हेक्टरी अशी आहे काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रुपये १,६०,००० प्रती हेक्टरी आहे.
कोकणातील आंबा व काजू पिकाच्या नुकसानी पोटी फळ पिक विमा न उतरवलेल्या परंतु ज्या शेतकऱ्यांचा नुकसान झालेला आहे त्यांना देखील आर्थिक मदत देण्याची शासनाची घोषणा केली आहे.
राज्य शासनाच्या मंजूर करण्यात आलेल्या NDRF निकषानुसार कोकणातील नुकसान ग्रस्त झालेल्या 42000 हेक्टर वरील शेतकऱ्यांना 209 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 52 हजार 628 शेतकऱ्यांना 98 कोटी 45 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 42 हजार 322 शेतकऱ्यांना 79 कोटी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील 17000 शेतकऱ्यांना 20 कोटी 28 लाख रुपये तर पालघर जिल्ह्यातील 17,612 शेतकऱ्यांना 6 कोटी 47 लाख रुपयाची आणि ठाणे जिल्ह्यातील 4669 शेतकऱ्यांना एकूण चार कोटी 84 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे.