शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या संदर्भात शासनाचा मोठा निर्णय || AHD Maharashtra

शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या संदर्भात शासनाचा मोठा निर्णय

AHD MAHARASHTRA 

पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे, राज्यातील पशु वैद्यकीय दवाखान्याच्या वेळेत बदल केला आहे.

एकंदरीत राज्यात पशु वैद्यकीय दवाखान्याच्या वेळा १९९६ पासून २०२१ पर्यंत सकाळी 7 ते 12 व दुपारी 4 ते 6 अशा होत्या. 

मात्र यात जानेवारी,2021 पासून बदल करून सदर वेळेत सकाळी 9.00 ते दुपारी 4.30 असा बदल करण्यात आला.

मात्र शेतकऱ्यांच्या कामाच्या वेळा व पशुवैद्यकीय दवाखांन्याच्या वेळा ह्या परस्पर पूरक नसल्याने पशुधनावर करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्यसेवा देण्यात समस्या येत होत्या. पर्यायाने या दिल्या जाणाऱ्या सेवा मध्ये ही मोठी घट झाली या सर्व बाबींचा विचार करता शासनाकडून हा महत्वाचा बदल केलेला आहे.

शेतकऱ्यांच्या/पशुपालकांची सोय विचारात घेऊन पशुवैद्यकीय दवाखान्यांची वेळ सकाळी 9.00 ते दु.4.30 ऐवजी सकाळी 8.00 ते दु. 1.30 व दु.3.00 ते सांय.5.00 वा असा दोन सत्रात करण्यात आली आहे.

यासंदर्भातील शासन निर्णय येथे पहा 👇🏻 


एकंदरीत तीनही ऋतूमानातील हवामान व शेतकरी/शेतमजूरांचा रोजचा दिनक्रम या सर्व बाबींचा विचार करता त्यांना सकाळची वेळ ही पशूंची निगा, व्यवस्थापन इत्यादीकरिता अत्यंत महत्त्वाची ठरते. 

या वेळेत त्यांचे पशुधनाचे निरीक्षण करणे सहज शक्य असल्याने पशुंचा माज, आजारपणाची लक्षणे जसे की, चारा-पाणी न खाणे, निस्तेज दिसणे, दुध उत्पादन कमी होणे, मंद हालचाल, शेण व मूत्रातील बदल इ. बाबी अचूकपणे लक्षात येऊ शकतात.

याच वेळेत जनावरांना तात्काळ उपचार होण्यासाठी पशुवैद्यक उपलब्ध असणे अत्यावश्यक असल्याने पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे.




या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map