नमो शेतकरी 8वा हप्ता वितरण; किती शेतकरी पात्र? Namo Shetkari 8th Installment

नमो शेतकरी 8वा हप्ता वितरण; किती शेतकरी पात्र? 

Namo Shetkari 8th Installment

गेल्या 5 महिन्यापासून राज्यातील शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता २५ मार्च रोजी केले जाणार आहे.

राज्य शासनाने 16 मार्च 2026 रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरीत करण्यासाठी 1774 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली.

साहजिकच निधी उपलब्ध केल्याने हा  'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'चा ८ वा हप्ता २५ मार्च रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला जाणार आहे.

राज्यातील पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा योजनेचा लाभ दिला जाणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा राज्यभरातील सुमारे 89 लाख 74 हजार  पात्र शेतकऱ्यांना वितरीत केला जाणार आहे.यासाठी साधारणपणे 1798 कोटी रुपयांचे वितरण केले जाईल.

केंद्र सरकारच्या 'पीएम-किसान सन्मान निधी योजने'च्या धर्तीवर राज्य सरकारने 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना' सुरू केली आहे. वाढता शेती खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, या उद्देशाने थेट आर्थिक मदत पुरवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 'पीएम-किसान' (केंद्र) योजनेतून दरवर्षी ६,००० रुपये आणि 'नमो शेतकरी' (राज्य) योजनेतून अतिरिक्त ६,००० रुपये मिळतात; अशा प्रकारे त्यांना दरवर्षी एकूण १२,००० रुपयांची मदत प्राप्त होते.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत सात हप्ते वितरित करण्यात आले असून हा ८ वा हप्ता ऑगस्ट २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीसाठी वितरीत केला जाणार आहे.




या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

17.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026