ट्रॅक्टर सह अवजारांचे अनुदान येणार, कृषी यांत्रिकीकरण योजनेचा निधी वितरित | krishi yantrikaran 2026

कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या 74 हजार 360 लाभार्थ्यांना 735 कोटी अनुदानाची प्रतीक्षा 

krishi yantrikaran 2026

राज्यात कृषी क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने यांत्रिकीकरणाचा पर्याय पुढे आला. कृषी विकासाला गती देण्यासाठी आता यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून बळ देण्यात येत आहे. 

महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत राज्यात कृषि यांत्रिकीकरणांतर्गत केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय कृषि विकास योजना कृषि यांत्रिकीकरण, राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण या योजना महाडीबीटी पोर्टलवर राबविल्या जात आहेत. या योजनांद्वारे अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांसाठी सन 2026-27 मध्ये तीनही योजनेत 263.72 कोटी रुपये इतका निधी प्राप्त झालेला असून प्रकि्रयेत असलेल्या लाभार्थ्यांना अनुदान अदायगीची कार्यवाही सुरू असल्याचे कृषि संचालक (पुणे) अंकुश माने यांनी कळविले आहे.

सन 2025-26 मध्ये महाडीबीटी पोर्टलवर कृषि यांत्रिकीकरणासाठी अर्ज करणा-या लाभार्थ्यांची प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्य पध्दतीने 3603338 अर्जाची निवड करण्यात आली होती. 

सर्व लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आलेला होता. त्यामुळे विहीत कालावधीत कागदपत्रे अपलोड न केल्याने 3164805 लाभार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले. प्रक्रियेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी 239337 लाभार्थ्यांना पूर्वसंमती प्रदान करण्यात आलेली आहे. पूर्वसंमती प्रदान केलेल्या लाभार्थ्यांपैकी 232797 लाभार्थ्यांनी यंत्रे/औजारांची खरेदी केलेली असून त्यांनी देयके अपलोड केलेली आहेत. सदर लाभार्थ्यांसाठी सन 2025-26 मध्ये वरील तीनही योजनेंतर्गत एकूण 1056.31 कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. 

GR 24.03.2026

सन 2025-26 मध्ये राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी रु.150.00 कोटी इतका निधी वितरीत

GR 25.03.2026


गेल्या वर्षांत 72 हजार 946 लाभार्थींना 444.99 कोटींहून अधिक रकमेचे अनुदान कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.


शेतकऱ्यांना शेतीपूरक यंत्र सामग्री खरेदी करण्यास प्रोत्साहित करणे आणि त्याद्वारे कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुरुप आणि मागणीप्रमाणे लागणारी यंत्रसामग्री आणि अवजारे या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. 

यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर चलित अवजारे, मनुष्य/बैल चलित अवजारे, स्वयंचलित यंत्रे, काढणीपश्चात संयंत्रे आदींचा त्यात समावेश आहे. छोट्या शेतकऱ्यांना वाजवी दरात या यंत्रसामग्रीचा लाभ घेता यावा यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बळ दिले जात आहे. 

ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक आणि महिला लाभार्थींसाठी किमतींच्या 50 टक्के किंवा 1.25 लाख यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान स्वरुपात देण्यात येते. 

तर, इतर लाभार्थींसाठी किमतींच्या 40 टक्के किंवा रुपये 1 लाख यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून दिली जाते. मात्र,  पॉवर टिलर, ट्रॅक्टर चलित औजारे, मनुष्य/बैल चलित औजारे, स्वयंचलित यंत्रे, काढणी पश्चात संयंत्रे आदी इतर औजारांसाठी केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या अनुदान मर्यादेनुसार कृषी यांत्रिकीकरण अभियानात अनुदान दिले जाते.

गेल्या तीन वर्षांत ट्र्रॅक्टरसाठी 21 हजार 375 लाभार्थ्यांना 260.26 कोटी रुपये अनुदान, पॉवर टिलरसाठी 5 हजार 907 लाभार्थ्यांना 44.92 लाख रुपये, 

ट्रॅक्टर चलित औजारांसाठी एक लाख एक हजार 532 लाभार्थींना 461 कोटी नऊ लाख रुपये, 

मनुष्य /बैल चलित औजारांसाठी चार हजार 156 लाभार्थींना दोन कोटी 39 लाख रुपये, 

स्वयंचलित यंत्रांसाठी दोन हजार 317 लाभार्थ्यांना 15 कोटी 772 लाख रुपये 

काढणी पश्चात संयंत्रांसाठी एक हजार 936 लाभार्थ्यांना 15 कोटी 97 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. 

याशिवाय, छोट्या शेतकऱ्यांना वाजवी दरात या यंत्रसामग्रीचा लाभ घेता यावा, यासाठी कृषी औजारे बॅंक (सेवा सुविधा केंद्र) सुरु करण्यात आले असून, त्याचा लाभ 576 शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यासाठी 24 कोटी 9 लाख रुपये अनुदान देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map