Urea fertilizer शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! युरिया खतासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! युरिया खतासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय

Urea fertilizer SSF Urea New Packing 

केंद्र शासनाच्या माध्यमातून युरियाच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे या संदर्भातील एक महत्त्वाचे आदेश, अधिसूचना कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे.

या अधिसूचनेनुसार सल्फर लिपीत युरियाच्या 40 किलोच्या पिशवी ₹254 कमाल किंमत निश्चित करण्यात आलेली आहे.



भारतीय खत नियंत्रण कायदा 1985 च्या अंतर्गत हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे.

कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून ही निश्चित केलेली किंमत डीलर्स उत्पादक, आयातदार, चहा कॉपी, रबर उत्पादन इत्यादी सर्व शेतकऱ्यांना ही किंमत लागू राहणार आहे. 

शेतकऱ्यांना युरिया ठराविक आणि परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

याचबरोबर ₹२५४ रुपयांची ही कमाल किंमत GST, केंद्र व राज्य कराव्यतिरिक्त असणार आहे, विक्रीच्या वेळी इतर कर वेगवेगळ्या स्वरूपात आकारले जाऊ शकतात.

याच बरोबर या युरिया च्या पिशवीवरती पॅकिंग शुल्क आकारण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, ज्यामुळे डीलर ला आता लहान वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून देता येणार आहेत.

यासाठी पॅकिंग शुल्क आकारले जाईल जसे की २ किलो साठी ₹१.५० पैसे प्रति पॅकिंग, ५ किलो साठी ₹२.२५ पैसे पॅकिंग, १० किलो साठी ₹३.५० पैसे प्रति पॅकिंग, २५ किलो साठी ₹५ रुपये प्रति पॅकिंग असे शुल्क आकारले जाईल.

सल्फर लिपीत युरिया हा नायट्रोजन सोबत सल्फरचा थर असलेला हा सुधारित युरिया आहे ज्याची ४० kg बॅग ₹२५४ ला मिळणार आहे.

अधिसूचना 👇🏻👇🏻

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

17.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026