Recent Post

Popular Posts

महाराष्ट्रासाठी केंद्राचा नवा प्रकल्प; सुरत चेन्नई चा मार्ग मोकळा || Surat Chennai Highway

महाराष्ट्रासाठी केंद्राचा नवा प्रकल्प; सुरत चेन्नई चा मार्ग मोकळा 

Surat Chennai Highway

आज १४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक कार्य समितीने महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग -160 ए च्या घोटी–त्र्यंबक (मोखाडा)–जव्हार- मनोर- पालघर रस्त्यासाठी मंजुरी दिली आहे.

ज्यामध्ये या विभागाच्या  154.635 किमी  लांबीच्या पुनर्वसन व सुधारणेला मंजुरी दिली आहे. यासाठी एकूण भांडवली खर्च 3,320.38 कोटीच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.

Surat chennai highway

नाशिकच्या पश्चिम भागात विशेषतः अंबड आणि सातपूर भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे MIDC विकसित केलेल्या औद्योगिक युनिट्स मोठ्या प्रमाणात आहेत.यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होते. 

सध्या ही वाहतूक पूर्णतः नाशिक शहरातून एनएच-848 मार्गे जात असल्यामुळे शहरी रस्त्यांवर मोठा ताण येत आहे. या रस्त्यावर क्षमते पेक्षा जास्त ट्रॅफिक आहे.



मुंबईकडून एनएच-848 (6 पदरी ): 50,000–60,000 प्रवासी वाहन प्रति दिन (एल.ओ.एस.-सी : 55,000)

पुण्याकडून एनएच-60 (4 पदरी ): 40,000–50,000 प्रवासी वाहन प्रति दिन (एल.ओ.एस.-सी: 36,000)

नव्याने मंजूर करण्यात आलेल्या या महामार्गामुळे त्र्यंबक मार्गे औद्योगिक क्षेत्रांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे शहरातून जाणाऱ्या वाहतुकीचा ओघ कमी होऊन मुंबईच्या (पश्चिमेकडील) आणि दक्षिणेकडील बाजूच्या वाहतुकीला एनएच -848 वरील इगतपुरी इंटरचेंजद्वारे समृद्धि महामार्ग वापरता येणार आहे. 

या महामार्गावर 2028 पासून दररोज १०,००० प्रवासी इतकी अपेक्षित वाहतूक आहे.

एन एच-160 ए हा महामार्ग त्र्यंबक वरून पश्चिमेकडे मानोर आणि पालघरकडे जातो व पुढे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे (एनई -4) तसेच एन एच-48 आणि पश्चिम किनारपट्टी तसेच पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागाला जोडणार आहे.

सद्यस्थितीत या मार्गावर सुमारे 4,500 प्रवाशी वाहन प्रति दिन एवढी वाहतूक आहे, मध्यवर्ती मार्ग असलेल्या या रस्त्याचे दुहेरीकरणासह सुधारणा झाल्यास मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीचा प्रवास अधिक सुरळीत होईल.

 याचबरोबर मानोर ते पालघर विभाग शहरी विस्तारातून जातो, जिथे सुमारे 12,000 प्रवाशी वाहन प्रति दिन एवढी वाहतूक आहे, या शहरी विभागात वाहतुकीला अधिक सुरळीत करण्यासाठी चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव आहे.

हा प्रकल्प पीएम गतीशक्तीच्या तत्त्वानुसार प्रस्तावित केला आहे आणि यामुळे महाराष्ट्र राज्यातील 6 पीएम गतीशक्ती आर्थिक नोड्स, 1 सामाजिक नोड आणि 8 लॉजिस्टिक नोड्स जोडले जाणार आहेत.

हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवास अधिक सुरळीत आणि सुरक्षित होईल व प्रवासाचा वेळ कमी होऊन वाहन ऑपरेटिंग खर्च  देखील मोठ्या प्रमाणात घटणार आहे.

घोटी पालघर या महामार्गाच्या अंमलबजावणीमुळे आदिवासी भागातील मुलभूत पायाभूत सुविधा सुधारल्या जातील व आर्थिक विकासात योगदान मिळेल. 

या प्रकल्पामुळे अंदाजे 19.98 लाख प्रत्यक्ष रोजगार आणि 24.86 लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.

Project Name

Rehabilitation and upgradation of Ghoti – Trimbak (Mokhada) – Jawhar – Manor – Palghar section of NH-160A to 2 Lane /4 Lane with paved shoulder configuration

Corridor  Sinnar to Palghar NH 160A  Length (km) 154.635

  1. Total Civil Cost (Rs Cr.) 2594.49  
  1. Land Acquisition Cost (Rs Cr.) 725.89 
  1. Total Capital Cost (Rs Cr.) 3320.38

Major Roads Connected

  • Expressways: Delhi–Mumbai Expressway (NE-4) and Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg
  • National Highways: NH-848 and NH-48.
  • State Highways – SH-04, SH-73, SH-76, SH-77, SH-78 and SH-30

Economic Nodes:  

  • 02 SEZs- Tarapur & Boisar, 02 Industrial Parks- Palghar & Mokhada, 02 Industrial Co-Operative Estates- Wada & Tarapur, 

Social Nodes: 

  • 1 Tribal district- Palghar, 
  • 06 Tourist Places- Trimbakeshwar, Jawhar Rajwada, Vaitarna River, Kevla Beech, Arnala Fort, Tungeshwar Sanctuary)

logistics nodes:

  • 03 Major Railway Station- Palghar Nashik & Shirdi, 
  • 03 Airport- Ozar, Shirdi & Mumbai, 
  • 02 Ports- Vadhavan & JNPT

Major Cities / Towns Connected 

Trimbak (Mokhada), Jawhar, Manor, Palghar, Mumbai, Nashik

Employment Generation Potential

  • 19.98 lakh person-days of direct employment
  • 24.86 lakh person-days of indirect employment

Annual Average Daily Traffic (AADT) in FY-25

  1. Ghoti – Trimbak section: 6,700 PCU/day
  1. Trimbak (Mokhada) – Manor section: 4,323 PCU/day
  1. Manor – Palghar section: 12,455 PCU/day