Onion Export Subsidy मोठी बातमी ! केंद्र शासनाचा कांदा निर्यात सबसिडी 50% कपातीचा निर्णय मागे

मोठी बातमी ! केंद्र शासनाचा कांदा निर्यात सबसिडी 50% कपातीचा निर्णय मागे.

Onion Export News

केंद्र शासनाच्या माध्यमातून निर्यात वस्तूवरील कर व शुल्क परतावा योजनेअंतर्गत 50% सबसिडी कमी करण्याचा घेण्यात आलेला निर्णय मागे घेण्यात आलेला आहे.

पूर्व दिली जाणारी सबसिडी आता दिले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याच्या संदर्भातील एक शुद्धिपत्रक 24 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आलेले आहे.

GR 👇🏻👇🏻

केंद्र शासनाच्या माध्यमातून निर्यात वस्तू वरील कर व शुल्क परतावा योजनेच्या अंतर्गत दिले जाणारे सबसिडी ही 50% कमी करण्याचा निर्णय घेतला होता 

त्याच्यामुळे कांद्यासारख्या वस्तूची निर्यात कमी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. कारण कांद्याच्या निर्यातीवरील सबसिडी कमी झाल्यामुळे कांद्याच्या निर्यातीचा वाढणारा खत याच्यामुळे भारतीय कांद्याचा आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणारे मूल्य या सर्वांमुळे कुठेतरी निर्यात कमी होण्याची शक्यता होती.

सध्या स्थानिक बाजारात कांद्याचे भाव खूप मोठ्या प्रमाणात गडगडलेले आहेत शेतकरी गेले काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चिंतेत आहेत आणि आशा मध्ये जर कांद्याची निर्यात कमी झाली तर आणखीन हे भाव गडगडतील असा अंदाज तज्ञांनी वर्तविला होता.

मोठ्या प्रमाणात याच्याविरुद्ध वातावरण निर्माण झालं होतं काही ठिकाणी याच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात आलेली होती तर दोन दिवसांमध्ये बाजारामध्ये अतिशय दबावाच असं वातावरण निर्माण झालेलं होते.

शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून 24 फेब्रुवारी 2026 रोजी या योजनेच्या संदर्भातील शुद्धिपत्रक काढून पूर्वीप्रमाणेच या योजनेला सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे 50% सबसिडी कमी करण्याचा निर्णय हा मागे घेण्यात आल्याचे घोषणा या पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. 

त्याच्यामुळे साहजिकच आता पुन्हा एकदा कांदा निर्यातीला चालना मिळेल.



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map