खुशखबर! या मुलांच्या खात्यात DBT ने येणार २२५० || Balsangopan Yojana

खुशखबर! या मुलांच्या खात्यात DBT ने येणार २२५० 

Balsangopan Yojana 2026

BalSangopan Yojana Scheme 

अखेर तब्बल सहा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर क्रांतिज्योती सावितीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान मंजूर, राज्य शासनाची निधी वितरणास मंजुरी.



राज्यात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ सुधारित अधिनियम २०२१ कलम २ (१४) व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ नुसार अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवा-याची गरज असलेल्या ० ते १८ वयोगटातील मुलां-मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटूंब उपलब्ध करुन देणे व संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे या मुख्य उद्देशाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राज्यात सन १९७५ मध्ये सुरु करण्यात आली आहे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या 30 मे 2023 च्या सुधारित मार्गदर्शक सूचनानुसार वित्त विभागाने दिलेल्या सूचनेनुसार सदर योजनेचा लाभ DBT प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात व संस्थेच्या खात्यात वितरीत करण्यात येत आहे.

सन २०२५-२६ या वित्तीय वर्षाकरिता स्वयंसेवी संस्था तसेच जिल्हा स्तरावरून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना शासन स्तरावरुन DBT प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात वितरीत करण्यासाठी 60 कोटी रुपयाचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

शासन निर्णय येथे पहा 👇🏻 👇🏻 




या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map