महानगरपालिका निवडणुका पार पडताच शासनाची घरकुल लाभार्थ्यांना खुशखबर.
PMAY Urban Upade
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था नगरपंचायत नगरपरिषद सह महानगरपालिकाच्या निवडणुका पार पडताच राज्य शासनाने शहरी घरकुल लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक निर्णय घेतलेला आहे.
राज्य शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना शहरी ज्याच्यामध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायती याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांच्या अनुदानाचा वितरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
शहरी आवास योजनेमध्ये लाभार्थी पात्र झाल्यानंतर गेले अनेक दिवसापासून निधीचे वितरण करण्यात आलेलं नव्हते, बरेच सारे हप्ते प्रलंबित होते अशा लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत.
यांच्यामधील पहिला निर्णय हा 13 जानेवारी 2026 रोजी घेण्यात आलेले ज्याच्यामुळे नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रामध्ये पात्र झालेले लाभार्थी तर 19 जानेवारी 2026 रोजी महानगरपालिका क्षेत्रातील लाभार्थी यांना निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
नगरपंचायत नगरपरिषद क्षेत्रातील लाभार्थ्यांकरता 13 जानेवारी 2026 रोजी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार 41030 इतक्या लाभार्थी केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.
या मंजूर करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यापैकी 33403 लाभार्थ्यांना राज्य शासनाचा 133 कोटी 61 लाख आणि केंद्र शासनाला 200 कोटी 41 ला असे एकूण 334 निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले आहे.
सोबत कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या नगरपंचायतीला नगरपरिषदेला किती लाभार्थ्यांना निधी मंजुरी देण्यात आलेले याची लाभार्थी यादी सुद्धा जोडण्यात आलेली आहे.
शासन निर्णय येथे पहा
याचबरोबर आज 19 जानेवारी 2026 रोजी महानगरपालिका महापालिका क्षेत्रातील जे काही पात्र लाभार्थीत अशा लाभार्थ्यांना निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
यामध्ये 2581 लाभार्थी हे मंजूर करण्यात आलेले ज्यांना केंद्र शासनाचा 15 कोटी 48 लाख रुपये राज्य शासनाचा दहा कोटी 32 लाख असा 25 कोटी 81 लाख निधी वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.
पात्र झालेल्या लाभार्थ्यांना या अनुदानाचे वितरण होण्याची अतिशय मोठी अशी प्रतीक्षा होती या निधीमुळे या मानधन थकीत असलेल्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.