राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय Mantrimandal baithak 2026 राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय दिनांक १४ ऑक्टोबर 2026 निर्णय संक्षिप्त मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन. घटनात्मक पदावर राहून सलग पंचवीस वर्षे यशस्वीरित्या जनसेवा केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला ठराव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मंत्रीगण यांच्याकडून टाळ्यांच्या गजरात ठरावाचे स्वागत. शासकीय मालकीच्या छोट्या, स्वतंत्ररीत्या बांधकामास अयोग्य, चिंचोळ्या आकाराच्या, उपयुक्त आकार नसलेल्या, पोहोच मार्ग नसलेल्या भूखंडांच्या वितरणाच्या धोरणात सुधारणा करण्यास मंजुरी. महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ च्या नियम ३७ व ३७ अ मधील तरतुदीत सुधारणा होणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क) श्री संत गजानन महाराज संस्...