मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता I IMD alert maharashtra

 

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

IMD alert maharashtra

नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच:

• नैऋत्य मोसमी पाऊस मध्यवर्ती अरबी समुद्रदक्षिण महाराष्ट्रतेलंगणचे आणखी काही भाग आणि दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओदिशाचे काही भाग आणि  आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या आणखी काही भागात आज 8 जून 2024 रोजी पुढे सरकला आहे.

• मध्यवर्ती अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्येमहाराष्ट्र (मुंबईसह) आणि तेलंगणच्या आणखी काही भागात पुढील 2-3 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाला आगेकूच करण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे.

• वातावरणातील तपांबराच्या तळाच्या आणि मध्यम पातळीवर 16° उत्तरेदरम्यान एक पट्टा तयार झाला आहे. महाराष्ट्र ते उत्तर केरळपर्यंत तपांबराच्या तळाच्या पातळीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या प्रभावाखालीः

• पुढील पाच दिवसात कोकण आणि गोव्यातमध्य महाराष्ट्रमराठवाडाकर्नाटक आणि केरळमाहेलक्षद्वीप मध्ये बऱ्याच भागात मेघगर्जनाविजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह(40-50 किमी/तास) हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यताआंध्र प्रदेश किनारपट्टी आणि याणम्रायलसीमातेलंगणतामिळनाडूपुदुच्चेरी आणि काराईकलमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता.

• कोकण आणि गोवामध्य महाराष्ट्रकर्नाटक किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी 12 जून रोजी मुसळधार ते अतिमुसळधार, 10 ते 12 जून दरम्यान केरळ आणि माहेमध्ये, 8 ते 10 जून दरम्यान दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत भागातमराठवाडातामिळनाडूपुदुच्चेरी आणि कराईकल आणि तेलंगणमध्ये 8 ते 10 जून दरम्यानमध्य महाराष्ट्रात 9 ते 11 जूनदरम्यानकर्नाटक किनारपट्टीवर 8 ते 9 जून दरम्यान आणि उत्तरेकडील कर्नाटकच्या अंतर्गत भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढील पाच दिवस उष्णतेची लाटरात्रीचे उबदार वातावरण आणि उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा

• ईशान्य मध्य प्रदेशझारखंडबिहारपश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातील भाग या ठिकाणी तुरळक क्षेत्रात  8 ते 12 जूनदरम्यानओदिशापंजाब,हरयाणा येथे 9 ते 12 जून दरम्यानजम्मू काश्मीर लडाखगिलगिटबाल्टिस्तानमुझफ्फराबादहिमाचल प्रदेश येथे 10 ते 12 जून दरम्यान उष्णतेची लाट असेल .

• 8 जून रोजी उत्तर प्रदेशात तुरळक भागांमध्ये उष्णतेची लाट असेल आणि या  भागातील काही ठिकाणी 9 ते 12 जून दरम्यान उष्णतेची आणि अतितीव्र उष्णतेची लाट असेल.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 ते 8 जून 2024 रोजी यलो अलर्ट तर दि. 9 ते 11 जून 2024  रोजी ऑरेंज अलर्ट असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे.

जिल्ह्यात दि. 7 व 8 जून 2024 या कालावधीत गडगडाट होऊन पाऊस पडण्याची व वीजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच दि. 7 जून रोजी 50 ते 60 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  तसेच दि. 9 ते 11 जून या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

या कालावधीत वीजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी

विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा. विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी APP’ डाऊनलोड करून घ्यावे. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

नियंत्रण कक्ष व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे जिल्हा नियंत्रण कक्ष – 02362-228847 किंवा टोल फ्री 1077, 7498067835. पोलीस नियंत्रण कक्ष- 02362-228614 पोलीस टोल फ्री हेल्पलाईन-112, दोडामार्ग तालुका नियंत्रण कक्ष- 02363-256518, सावंतवाडी तालुका नियंत्रण कक्ष- 02363-272028, वेंगुला तालुका नियंत्रण कक्ष- 02366-262053, कुडाळ तालुका नियंत्रण कक्ष- 02362-222525, मालवण तालुका नियंत्रण कक्ष- 02365-252045, कणकवली तालुका नियंत्रण कक्ष- 02367-232025, देवगड तालुका नियंत्रण कक्ष- 02364-262204, वैभववाडी तालुका नियंत्रण कक्ष- 02367-237239 या प्रमाणे नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमाक आहे.

हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in/mumbai/mcdata/district.pdf  या संकेतस्थळावरून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष ०२३६२-२२८८४७ किंवा टोल फ्री १०७७ किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क करा. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी.