मोठी बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे. OPS scheme Maharashtra

मोठी बातमी ! अखेर शासकीय कर्मचाऱ्यांचा संप मागे.

OPS scheme Maharashtra 


राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी 14 मार्चपासून संप पुकारला होता. 

गेल्या ७ दिवसापासून सुरू असलेला संपात मात्र, आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाची बैठक पार पडली.


या बैठकीत जुनी पेन्शन योजनेच्या मागणीबाबत तोडगा काढण्यात आला असून हा संप मागे घेण्याबाबत मसुदा तयार करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे. 

सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सामान्य जनतेला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गैरसोय झाल्याचे पाहायला मिळालं. तसेच या संपादरम्यान सरकारी कार्यालयातील कामकाजही ठप्प झालं होतं.

संपादरम्यान काही सरकारी कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून आणि काळे शर्ट घालून आंदोलन केलं. तसेच सरकारने जुनी पेन्शन योजनेबाबत योग्य निर्णय न घेतल्यास या संपाची धार यापुढेही तीव्र करण्यात येण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, आता हा संप मागे घेण्यात आला आहे.


सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळातील विश्वास काटकर यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला असल्याची माहिती दिली.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत एक समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यात ही समिती अहवाल सादर करेल'', असं काटकर यांनी यावेळी सांगितलं. तसेच उद्या मंगळवार पासून (दि.21 मार्च) सरकारी कर्मचारी कामावर हजर होणार आहेत.