ग्रामपंचायत निवडणूक खर्च 20 जानेवारी पर्यंत सादर करण्याचे निर्देश
gram panchayat election expense
राज्यात दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी ७५६२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या.
या निवडणुकीचा निकाल 23 डिसेंबर रोजी जाहीर झाला.
हिशोब सादर करण्याची अंतिम मुदत ही येत्या 20 जानेवारी 2023 रोजी संपत आहे.
या दिनांका पुर्वी हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई केली जाईल. यातील गांभीर्य लक्षात घेवून ग्रामपंचायत निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब तातडीने उमेदवारांनी सादर करावा.
या निवडणुकीत सदस्यपदासह थेट सरपंच पदाच्या ७ हजार ५६२ जागांसाठी हजारो उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. तसेच बरेच उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत.
निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनी त्यांचा निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब 20 जानेवारी 2023 पर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह जमा करणे आवश्यक आहे.
खर्चाचा हिशेब प्रतिज्ञापत्रासह सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याबाबतची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात येणार आहे असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.