शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता नवी योजना | Rashtriya pashudhan vikas abhiyan 2023

शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता मिळणार 50 % अनुदान

Rashtriya pashudhan vikas abhiyan 2023

  उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत नवीन सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान.


सन 2021-22 या वर्षापासून केंद्र शासनाने पशुसंवर्धन विभागाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत नविन सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस ( Rashtriya pashudhan vikas abhiyan ) मंजूरी दिली आहे. 
या योजनेतंर्गत शेळी, मेंढी, कुक्कुट व वराह पालनाकरीता 50 % अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यामध्ये अनुदानाची अधिकतम मर्यादा शेळी – मेंढी पालनाकरीता 50 लक्ष रूपये, कुक्कुट पालनाकरीता 25 लक्ष रूपये, वराह पालनाकरीता 30 लक्ष रूपये अशी असणार आहे. 

Online Application for NLM udaymitra

national livestock mission 2022-23

 तसेच पशुखाद्य व वैरण विकास उपअभियानातंर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादनकरीता सुद्धा 50 % अनुदान मिळणार आहे.  जे अधिकतम 50 लक्ष रूपये मर्यादेत असेल. 

  या  प्रकल्पाकरीता स्वहिस्स्सा व्यतिरिक्त उर्वरित आवश्यक निधी बँकेकडून कर्जाद्वारे उपलब्ध करून घ्यावयाचा आहे. 
Rashtriya pashudhan vikas abhiyan  योजनेचा लाभ व्यक्तीगत, व्यावसायिक, स्वयं सहायता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेली कंपनी, सहकारी दुध उत्पादक संस्था, सह जोखिम गट, सहकारी संस्था, स्टार्टअप ग्रुप आदी घेवू शकणार आहे. 

Rashtriya pashudhan vikas abhiyan 2021 योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.

 अर्ज सादर करताना सविस्तर प्रकल्प अहवाल DPR ,  पॅन कार्ड,  आधार कार्ड,  रहिवाशी पुरावा,  छायाचित्र, बँकेचा रद्द केलेला चेक आदी ऑनलाईन अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच अनुभवाचे प्रमाणपत्र, वार्षिक लेखामेळ, आयकर रिटर्न, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास सादर करावे लागणार आहे. 

Rashtriya pashudhan vikas abhiyan  या अभियानाच्या सर्व मार्गदर्शक सुचना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळ https://ahd.maharashtra.gov.in  व केंद्र शासनाच्या  पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळ https://www.nlm.udyammitra.in  यावर उपलब्ध आहे.

 योजनेच्या लाभासाठी https://www.nlm.udyammitra.in संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे. 

तरी सदर योजनेचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या   माध्यमातून करण्यात आले आहे.