भोगवटादार वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये कायद्यात बदल | varg 2 jamin act 2024

भोगवटादार वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये कायद्यात बदल


varg 2 jamin

NEW GR  08 Feb 2024

महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961(सुधारणा) अधिनियम 2023 अन्वये कलम 28-1 अअ मध्ये केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित

भोगवटादार वर्ग रूपांतरीत करताना आकारावयाच्या सवलतीच्या दरातील कालावधीला मुदतवाढ

महाराष्ट्र जमीन महसूल नियम, २०१९ मध्ये सुधारणा करून भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ रूपांतरीत करताना आकारावयाच्या सवलतीच्या दरातील कालावधीला मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. 

या निर्णयामुळे जनतेला याचा निश्चितच फायदा होईल, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. 

या बैठकीमध्ये भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतरीत करताना आकारण्यात येणाऱ्या सवलतीच्या दर कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळ बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे. 

यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल नियम, २०१९ मध्ये सुधारणा करून राज्यमंत्री मंडळाने दि. ०७ मार्च, २०२४ पर्यंतची मुदतवाढ दिली असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.


भोगवटादार वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये कायद्यात बदल 

varg 2 jamini act 2022


varg 2 jamini act 2022महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटदार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग १ मध्ये रुपांतरीत करणे) या अधिसूचनेची मुदत 8 मार्च रोजी संपली आहे. 

या अधिसूचनेस महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटदार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग १ मध्ये रुपांतरीत करणे) नियम २०२२ असा बदल करण्यात आला आहे.

  हा मसूदा महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब दि. 5 जुलै 2022 मध्ये प्रसिध्द करण्यात आला आहे. 

अधिसूचना बाधा पोहचण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आली असून अधिसुचनेमध्ये नमुद मसूदा 4 ऑगस्ट 2022 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येणार आहे. 

New gr link PDF

या अधिसुचनेच्या मसुद्या संबंधात कोणत्याही व्यक्तीच्या प्राप्त होणा-या हरकती किंवा सूचना अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय मुंबई 400 032 यांच्याकडे दि.3 ऑगस्टपर्यंत सादर करावे, असे आवाहन महसूल विभागाकडून करण्यात आले आहे.

Old GR 2019 PDF Link