रब्बी करिता शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे || seed subsidy for rabbi 2023 maharashtra
रब्बी हंगाम 2023 करिता शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे
seed subsidy for rabbi 2023 maharashtra
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य सन 2023 अंतर्गत रब्बी हंगामामध्ये हरभरा या पिकांचे अनुदानित दराने बियाणे वितरण.
दहा वर्षा आतील वाण या घटकाअंतर्गत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, राष्ट्रीय बीज निगम लि. कृषक भारती को ऑप या बियाणे वितरण संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे.
या अनुदानावरील बियाण्याचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
या बियाणास 25 रूपये प्रती किलो अनुदान देण्यात येते.तसेच हरभरा ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत प्रती शेतकरी एक एकर मर्यादेत अनुदानावर बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे.
यामध्ये 10 वर्षाआतील वाणास (राज विजय -202.फुले विक्रम.फुले विक्रांत, एकेजी -1109 पिडीकेव्ही कांचन बीजी -3062 पुसा पार्वती, बीजीएम-10216 पुसा ) रुपये 25 प्रती किलो व 10 वर्षावरील वाणास (जॉफी -9218 विशाल, दिग्विजय विजय, विराट) रूपये 20 प्रती किलो अनुदान वगळता उर्वरित रक्कम महाबीज वितरकाकडे देऊन खरेदी करावे.