Pocra yojana अंतर्गत फळबाग लागवड, बांबु लागवड व वृक्ष लागवड, अर्ज करण्यासाठी अखेरची मुदत.

पोकरा अंतर्गत फळबाग लागवड, बांबु लागवड व वृक्ष लागवड, अर्ज करण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदत.

  

कृषि विभाग महाराष्ट्र शासन व जागतिक बँक सहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत राज्यातील हवामान बदलामुळे उदभवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करणे, शेतकऱ्यांना शेती पुरक व्यवसाय करण्यास सहाय्य करणे या उद्देशाने १५ जिल्ह्यातील ५१४२ गावांमध्ये सन 2018-19 पासून प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु आहे. 

प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड, वृक्ष लागवड या घटकाची सन 2022-23 मधील लागवडीसाठी अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर, 2022 अखेरपर्यंत राहील. तद्नंतर प्रकल्पांतर्गत या घटकाखाली अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. 

सप्टेंबर, 2022 अखेर पर्यंत एकुण प्राप्त अर्जांवर निकषानुसार पुर्वसंमती मिळाल्यानंतर पात्र अर्जदारांनी प्रत्यक्ष लागवड नोव्हेंबर, 2022 अखेरपर्यंत पुर्ण करणे आवश्यक आहे व सदर विषयी संबंधीत शेतक-याने हमीपत्र लिहुन देणे गरजेचे आहे.


प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड व वृक्ष लागवड या घटकांचा लाभ घेण्याकरिता प्रकल्प गावातील इच्छुक असलेले शेतकरी बांधवांनी प्रकल्पाने उपलब्ध करुन दिलेल्या  http://dbt.mahapocra.gov.in  या संकेतस्थळावर नोंदणी करावी. 

नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रांमध्ये संबंधीत शेतकऱ्यांचे आधारकार्ड, सातबारा उतारा आठ-अ, मोबाईल क्रमांक अर्जदार अनुसुचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र सादर करावे.

एकदा नोंदणी केल्यानंतर प्रकल्पातील समाविष्ठ फळबाग लागवड, बांबू लागवड व वृक्ष लागवड बाबीकरीता स्वतंत्र अर्ज करावा. अधिक माहीतीसाठी प्रकल्प गावातील संबंधीत कृषि सहाय्यक किंवा समुह सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map