मोठी बातमी ! राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुकांना स्थगिती | election Maharashtra 2022

मोठी बातमी! राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुकांना स्थगिती

election Maharashtra 2022


राज्यामध्ये 8 जुलै 2022 रोजी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला होता. 

मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अनुमती याचिका 2021 ची सुनावणी ही 12 जुलै 2022 रोजी झाली त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकाच्या मागास प्रवर्गाबाबत दिलेला अहवाल माननीय सर्वोच्च न्यायालय सादर केलेला आहे.

आणि सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील पुढील सुनावणी ही 19 जुलै 2022 रोजी ठेवलेली आहे सदर पार्श्वभूमीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून 8 जुलै 2022 रोजी चे आदेशानुसार घेण्यास ठरवण्यात आलेल्या निवडणुका स्थगित करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने काढला आहे.

 या आदेशानुसार 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आखण्यात आलेला प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2022 या आदेशाद्वारे स्थगित करण्यात आलेला आहे सदर निवडणुकीसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम हा पुन्हा एकदा आखून देण्यात येईल, या बाबत पुन्हा एकदा प्रसिद्धी देण्यात येईल असे ही निवडणुका आयोगाने कळविले आहे.

याचबरोबर निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचारसंहिता आता लागू राहणार नाही.