ठिबक, तुषार सिंचनसाठी शेतकऱ्यांना 80% अनुदानाचा लाभ | Drip Subsidy Maharashtra 2022

ठिबक, तुषार सिंचनसाठी  शेतकऱ्यांना 80%  अनुदानाचा लाभ

drip subsidy maharashtra
drip subsidy maharashtra

Drip Subsidy Maharashtra 2022शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना PMKSY ( प्रति थेंब अधिक पीक) घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसविणे करिता अनुदान देण्यात येते. सन २०१७ च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मापदंडाच्या ५५ टक्के व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान (केंद्र हिस्सा ६० टक्के व राज्य हिस्सा ४० टक्के) कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यात येत होते. 

शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन ( Mukhymantri shaswat sinchan yojana ) योजनेद्वारे ठिबक व तुषार ( Drip subsidy सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

 या योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त २५ टक्के पूरक अनुदान व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त ३० टक्के पूरक अनुदान कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

 ऊस, केळी, हळद पिकास ठिबक सिंचनाचा व सोयाबीन, हरभरा पिकास तुषार सिंचनाचा वापर करून मोठया प्रमाणात क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी योजनेचा लाभ घ्यावा असे 

 

सन 2021-22 मध्ये केंद्र शासनाने खर्चाच्या मापदंडामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे अनुदानाच्या रक्कमेतही वाढ झाली आहे. 

सन 2021-22 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना देय 55 टक्के अनुदानास पुरक अनुदान 25 टक्के व इतर शेतकऱ्यांना (5 हेक्टरच्या मर्यादेत) देय 45 टक्के अनुदानास पुरक अनुदान 30 टक्के देय आहे. 

याप्रमाणे अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना 80 टक्के व इतर शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान मिळणार आहे.
 
या योजनेअंतर्गत यापूर्वी व सध्या 1 हेक्टरसाठी मिळणारा लाभ पुढीलप्रमाणे आहे. 

 • ठिबक सिंचन (1 हेक्टर साठी) लॅटरल अंतर (मी.) 1.2X0.6, 

 • पुर्वीची खर्च मर्यादा 1 लाख 12 हजार 237 रुपये, 
 • देय अनुदान 55 टक्के 61,730 रुपये तर 45 टक्के 50 हजार 507 रुपये आहे.

 •  सन 2021-22 मधील खर्च मर्यादा 1 लाख 27 हजार 501 रुपये. सन 2021-22 मधील देय अनुदानात 80 टक्के 1 लाख 2 हजार 1 रुपये तर 75 टक्के 95 हजार 626 रुपये आहे. 

 • लॅटरल अंतर (मी.) 1.5X1.5, 
 • पुर्वीची खर्च मर्यादा 85 हजार 603 रुपये, 
 • देय अनुदान 55 टक्के 47 हजार 82 रुपये तर 45 टक्के 38 हजार 521 रुपये. 

 • सन 2021-22 मधील खर्च मर्यादा 97 हजार 245 रुपये व सन 2021-22 मधील देय अनुदान 80 टक्के 77 हजार 796 रुपये आणि 75 टक्के मध्ये 72 हजार 934 रुपये आहे. 

 • लॅटरल अंतर (मी.) 5X5, 
 • पुर्वीची खर्च मर्यादा 34 हजार 664 रुपये, 
 • देय अनुदान 55 टक्के 19 हजार 65 रुपये, 45 टक्केत 15 हजार 599 रुपये आहे. 

 • सन 2021-22 मधील खर्च मर्यादा 39 हजार 378 रुपये. सन 2021-22 मधील देय अनुदान 80 टक्केत 31 हजार 502 रुपये तर 75 टक्केत 29 हजार 533 रुपये आहे. याशिवाय पिकांच्या वेगवेगळया अंतरानुसार अनुदान देय आहे

 • तुषार सिंचन क्षेत्र 1 हेक्टर पर्यंत पुर्वीची खर्च मर्यादा (75 एमएम) 21 हजार 901 रुपये, 
 • यापुर्वी देय अनुदान 55 टक्केत 12 हजार 45 रुपये तर 45 टक्केत 9 हजार 855 रुपये. 

 • सन 2021-22 मधील खर्च मर्यादा (75 एमएम) 24 हजार 194 रुपये. सन 2021-22 मधील देय अनुदान 80 टक्केत 19 हजार 355 रुपये तर 75 टक्केमध्ये 18 हजार 145 रुपये अनुदान देय राहील. 

 • तसेच तुषार सिंचन क्षेत्र 2 हेक्टर पर्यंत पुर्वीची खर्च मर्यादा 31 हजार 372 रुपये, 
 • देय अनुदान 55 टक्के 17 हजार 254 रुपये, 45 टक्केत 14 हजार 117. 

 • सन 2021-22 मधील खर्च मर्यादा (75mm) 34 हजार 657 रुपये व सन 2021-22 मधील देय अनुदान 80 टक्के 27 हजार 725 रुपये तर 75 टक्केमध्ये 25 हजार 992 रुपये अनुदान देय राहील, 


मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत ( Mukhyamantri Shaswat sinchan Yojana 2021 ) शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेमध्ये देय असलेल्या अनुदानाशिवाय अल्प व  अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांसाठी २५ टक्के व इतर शेतकऱ्यांसाठी ३० टक्के पुरक अनुदान राज्य शासनातर्फे अतिरिक्त अनुदान देण्यात येते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आता ही योजना उर्वरित सर्व तालुक्यात राबविण्यास मंजुरी दिली आहे.

२०२१ २२ साठी चा GR

सन 2021-22 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेकरिता रु. 200 कोटी निधी वितरीत करणेबाबत...


राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये या योजने अंतर्गत अल्प व अत्यल्पभुधारक शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी ८० टक्के अनुदान तर इतर शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देय राहणार आहे.

Apply Online watch video पहा कसा करायचा ठिबक तुषार पाईप लाईन साठी ऑनलाईन अर्ज

watch how to apply


पहा कसा करायचा ठिबक तुषार पाईप लाईन साठी ऑनलाईन अर्ज PMKSY मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना


या योजनेमध्ये राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील, शेतकरी आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त अशा एकूण २४६ तालुक्यांचा समावेश होता. शासनाने उर्वरित १०६ तालुक्यांचा समावेश करुन सदर योजना राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबविण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. यामुळे राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना वाढीव अनुदानाचा लाभ होणार आहे. राज्यामध्ये आतापर्यंत २५.७२ लक्ष हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आलेले असून, या नवीन योजनेमुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यास चालना मिळेल. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता रु.५८९ कोटी रकमेस शासनाची प्रशासकिय मान्यता आहे. सूक्ष्म सिंचनाची योजना ‘मागेल त्याला ठिबक’ या तत्त्वावर राबविणार असून अर्ज केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्याचा शासनाचा मानस आहे. लाभार्थ्याची पारदर्शकपणे निवड करणेसाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरु केले असून, त्यावर शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन योजनेचा लाभ घेता येईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले अर्ज महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने सादर करून सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री श्री. भुसे यांनी केले आहे.

http://www.prabhudevalg.com/2021/10/mukhyamantri-shashwat-krushi-sinchan.html ठिबक , तुषार च्या लॉटरी नंतर लागणारं कागदपत्रं नमुने http://www.prabhudevalg.com/2021/10/drip-subsidy-documents-for-mahadbt.html मोबाईल वर असा भरा mahadbt farmer scheme एक शेतकरी एक अर्ज योजना चा अर्ज https://youtu.be/K3ddP4Rnc9M https://youtu.be/x2-eCEdrZ7s