अखेर उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी, निधी वितरीत| Karjmafi yojna Maharashtra

अखेर उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी, निधी वितरीत| Karjmafi yojna Maharashtra

Mjpskyराज्यात  सन 2015-16 ते 2018-19 या सलग चार वर्षात विविध भागात अतिवृष्टी गारपीट दुष्काळ अशा अनेक संकटामुळे  राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमानात 50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती.

तसेच मोठ्या प्रमाणात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. 

या सर्व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे काही वर्षे शेतीशी निगडित कर्जाची शेतकऱ्यांकडून नियमित परतफेड होऊ शकली नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाल्यामुळे कर्जाच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे .

या सर्व परिस्थिती मुळे शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.  शेतकऱ्यांना या कर्ज बाजारीपनाच्या दुष्ट चक्रातून बाहेर काढून कर्ज मुक्त करण्याच्या हेतूने मा. मुख्यमंत्री महोदय यांनी हीवाळी अधिवेशन, 2019 मध्ये “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ( Mahatma jyotirav phule shetkari karjmukti yojana - MJPSKY)  2019” जाहीर केली.

यात कर्जमुक्ती योजनेत एप्रिल २०१५ पासून मार्च २०१९ च्या कालावधीत थकीत असलेली २ लाखापर्यंत ची पीक कर्ज माफी ( shetkari karjmafi Maharashtra ) करण्यात आली.

या योजनेअंतर्गत आता पर्यंत जवळपास ३२ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली यासाठी २१ हजार कोटी रुपये निधी देखील वितरीत करण्यात आला मात्र अद्याप ही पात्र असलेले मात्र कर्ज माफी न झालेले शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते.

या शेतकऱ्यांची कर्जमाफी ३१ मार्च पूर्वी केली जाईल अशी घोषणा देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती.

आणि अखेर ३० मार्च २०२२ रोजी या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २३० कोटी निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

शासन निर्णय ३० मार्च २०२२

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 (राज्यस्तर) (कार्यक्रम) योजनेसाठी निधी वितरीत करणेबाबत.


या निर्णया मुळे व निधी मुळे आता या शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती होणार आहे.

#MJPSKY