कृषि यांत्रिकीकरण उप अभियान ड्रोन खरेदीसाठी अनुदान, अर्ज सुरु | Drone Subsidy SMAM

 कृषि यांत्रिकीकरण उप अभियान (SMAM) अंतर्गत ड्रोन खरेदीसाठी अनुदान

अर्ज सुरु 

केंद्र शासनामार्फत शेतकऱ्यांना ड्रोनव्दारे फवारणी च्या सेवा व सुविधा उपलब्ध होण्यासाठी मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. 



सदर मार्गदर्शक सुचना केंद्र शासनाच्या https://farmech.dac.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांची सहकारी संस्था, ग्रामीण नव उदयोजक, कृषि पदवीधारक, अस्तीवात असलेली औजारे बँक इ. ड्रोन आधारित सेवा सुविधा केंद्र स्थापनेसाठी अर्थसहाय्य लाभ घेऊ शकतील.

योजनेच्या मार्गदर्शक सूचना करिता खालील लिंक वर क्लिक करा

भारतीय कृषि अनुसंधान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, कृषि विदयापीठ यांना शेतकऱ्यांचे शेतावर प्रात्यक्षिके घेण्यासाठी ड्रोन व त्याचे साहित्य खरेदीसाठी ( 100 टक्के रु. 10.00 लाख यापैकी जे कमी असेल ते) अनुदान उपलब्ध आहे.

शेतकरी उत्पादक कंपनी यांना शेतकऱ्याचे शेतावर प्रात्यक्षिके घेण्यासाठी ड्रोन व त्याचे साहित्य खरेदीसाठी ( 75 टक्के ) अनुदान उपलब्ध आहे.

ज्या अंमलबजावणी संस्थांना कृषी ड्रोन खरेदी करायचे नाहीत परंतु प्रात्यक्षिके करण्यासाठी हाय-टेक हब/निर्माते/ स्टार्ट-अप यांचे कडून ड्रोन भाडयाने घेईल. अशा परिस्थितीत त्यांना 100% रु. 6000 प्रति हेक्टर ( आकस्मिक खर्च जसे की ड्रोन भाडयाने घेण्यासाठी शुल्क / ड्रोन वैमानिकांच्या नियुक्तीसाठी प्रशिक्षणावर होणारा खर्च आणि विविध खर्च जसे की वाहतूक, कामगार, प्रसिध्दी आणि तांत्रिक साहित्याची छापाई इ. मदत प्रदान करेल,


दि. 31 मार्च, 2023 पर्यंत प्रात्यक्षिक आयोजित केले जातील, प्रात्यक्षिकांसाठी ड्रोनची खरेदी साठी आर्थिक सहाय्य 31 मार्च, 2023 पर्यंत लागू राहील

पात्र लाभार्थीसठी अर्जाचा नमुना तालुका कृषि अधिकारी यांचेकडे उपलब्ध आहे. तालुका कृषि अधिकारी यांचेमार्फत अर्ज जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयास सादर करावा, असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे.


Drone subsidy in Maharashtra