पोलीस पाटील भरती प्रक्रिया तातडीने राबविणार; या जिल्ह्याचे अर्ज सुरु | Police Patil Bharti 2022

पोलीस पाटलांची रिक्त पद  भरती प्रक्रिया तातडीने राबविणार 

Police Patil Bharti 2022

पोलीस पाटील हा शासनाचा प्रतिनिधी म्हणून गावपातळीवर कार्यरत असतो. गावाची कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची आहे.

राज्यात सर्व विभागात एकूण १२४४२ पोलीस पाटलांची पद रिक्त आहेत. 




हि रिक्त पद भरावीत, पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ, शासनातर्फे विमा योजना सुरू करणे, निवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्षे करणे, निवृत्तीनंतर ठोस रक्कम अथवा पेन्शन मिळणे, अनुकंपा तत्व लागू करणे, कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये नुकसानभरपाई देणे व सरकारी सेवेत सामावून घेणे, अशा विविध मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत एक  बैठक आयोजित करण्यात आली होती. 


यावेळी  गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव महसूल नितीन करीर, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, प्रधान सचिव गृह संजय सक्सेना, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि राज्यातील विविध पोलिस पाटील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


या बैठकीत राज्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया ( Police Patil Bharti 2022 ) तातडीने सुरु करण्याबरोबरच पोलीस पाटलांचे मानधन वेळेत अदा करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

याचबरोबर काही कारणास्तव शेजारच्या गावांचा पोलिस पाटील यांना अतिरिक्त कार्यभार दिला जातो. या अतिरिक्त कार्यभारासाठी अतिरिक्त भत्ता देण्याच्या मागणीस यावेळी मान्यता देण्यात आली. तसेच अतिरिक्त कामकाजासाठी अतिरिक्त भत्ता देण्याचे निर्देश त्यांनी गृह विभागास दिले. पोलीस पाटलांना प्रत्येक जिल्हयामध्ये पोलीस पाटील भवन उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारतीमध्ये पोलीस पाटील यांच्यासाठी एक कक्ष निश्चित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतलेला आहे. त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत ग्रामविकास विभागास कळविण्यात यावे तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये भवन उपलब्ध करुन देण्याबाबत पालकमंत्री स्तरावर निर्णय घेण्याबाबत कळविण्यात यावेत. असेही त्यांनी सांगितले.


यावेळी पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांबाबत गृह व महसूल विभागाने सकारात्मक निर्णय घेऊन कार्यवाही करावी, असे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.

सातारा उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत पोलीस पाटील भरती कार्यक्रम जाहिर.


उपविभागीय दंडाधिकारी, सातारा उपविभाग, सातारा यांच्या कार्यालयामार्फत उपविभाग सातारा अंतर्गत सातारा व जावली महसूली उपविभागातील सातारा व जावली तालुक्यातील गावांसाठी, ती गांवे ज्या प्रवर्गामध्ये दर्शविण्यात आली आहेत, त्या प्रवर्गाकरिता पोलीस पाटील या पदाकरिता, गावनिहाय एका जागेसाठी अर्ज मागविण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली आहे.


पोलीस पाटील भरती 2022 ( Police Patil Bharti 2022 ) चा कार्यक्रम खालीलप्रमाणे असेल 

  • जाहीरनामा  प्रसिध्दी दि. 22 फेब्रुवारी 2022, 
  • अर्ज करण्याचा कालावधी दि. 23 फेब्रुवारी ते 4 मार्च 2022 अखेर.  
  • वेळ - सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत  
  • अर्ज स्विकारण्याचे ठिकाण - तहसिल कार्यालय सातारा (निवडणुक शाखा संगणक कक्ष) 

येथे (रविवार व शासकीय सुट्टी वगळून) पुराव्यांचे कागदपत्र सोबत जोडून समक्ष दाखल करावेत..
छाननीअंती पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द  करण्याचा दिनांक  दि. 8 मार्च 2022. 


लेखी परिक्षेसाठी उमेदवारास प्रवेशपत्र देणे दि. 10 मार्च 2022.  लेखी परिक्षेचा दिनांक, ठिकाण व वेळ -दि.13 मार्च 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता (उपविभागीय अधिकारी, सातारा यांचे कार्यालयाचे क्षेत्रातील सातारा शहरातील सोयीचे ठिकाणी) तोंडी परीक्षा दि. 22 मार्च 2022 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून मुलाखती संपेपर्यंत. स्थळ - उपविभागीय अधिकारी कार्यालय, सातारा.  

दि. 28 मार्च 2022 रोजी अंतिम निकाल जाहिर होईल. 
अधिक माहितीसाठी संबंधितांनी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, सातारा येथे संपर्क साधावा, असेही आवाहन 
उपविभागीय दंडाधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले आहे.