रेती साठी आणखी वाट पाहावी लागणार, निविदा प्रक्रियेला मुदतवाढ | Reti dhoran 2023

रेती साठी आणखी वाट पाहावी लागणार, निविदा प्रक्रियेला मुदतवाढ 

Reti dhoran 2023


परभणी रेतीघाटाच्या ई निविदा नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी इच्छुक मान्यता प्राप्त संस्था, व्यक्तींना ई-निविदा सादर कराव्यात. किमान ३ ई-निविदा प्राप्त मौजे खडका येथील रेतीडेपोची ई-निविदा उघडण्याचा दिनांक ८ मे रोजी असून ई-निविदा उघडल्यानंतर लवकरच डेपो सुरु करण्यात येईल.

जिल्ह्याती ११ रेतीडेपो उखळद ता. परभणी, राजुरा ता. मानवत, खुपसा ता.सेलू, गौडगाव ता. गंगाखेड, लक्ष्मणनगर ता. पुर्णा, खडका ता. सोनपेठ, शेळगाव ता. सोनपेठ, बरबडी ता. पालम, भोगाव ता. पालम, मानकेश्वर काकडे आणि वझर ता. जिंतूरचा समावेश आहे- जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. गौंड

राज्य शासनाच्या रेती धोरणानुसार जिल्ह्यातील वाळूघाट डेपोची ई-निविदा प्रक्रिया २७ एप्रिलपासून सुरु झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त २३ रेती घाटाकरिता ११ ठिकाणी डेपो निश्चित करण्यात आले असून, नागरिकांना लवकरच रेती उपलब्ध होणार- जिल्हा खनिकर्म अधिकारी

रेतीबाबतची ई-निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन रेतीघाटांसह डेपोंचा ताबा यशस्वी निविदाधारकास देण्यात येणार असून, त्यानंतर नागरिकांनी मागणी नोंदविल्यानुसार या डेपोवरून रेती उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नागरिकांनी महाखनिज प्रणालीवर आधार क्रमांकासह नोंदणी करणे आवश्यक आहे.

सेतू केंद्रामार्फतही नागरिकांना नोंदणी करता येणार आहे. मागणी नोंदविल्यानंतर १५ दिवसाच्या आत डेपोमधून रेती घेऊन जाणे ग्राहकांवर बंधनकारक असेल. एका कुटुंबास एका वेळी कमाल ५० मेट्रीक टन रेती अनुज्ञेय आहे. 

त्यानंतर वाढीव रेती हवी असल्यास ती मिळाल्याच्या दिनांकापासून एका महिन्यानंतर रेतीची मागणी करता येईल. यासाठी जिल्ह्यात ११ ठिकाणी डेपो निश्चित करण्यात आले आहेत. घाटातून रेती उत्खनन, डेपोपर्यंत वाहतूक, डेपोनिर्मिती, व्यवस्थापन व विक्री करण्यासाठी ई-निविदा parbhani.nic.inmahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

ई-निविदा सादर करण्याची विहित मुदत दिनांक ३ मे २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत होती. विहीत मुदतीत ११ रेती डेपोपैकी केवळ सोनपेठ तालुक्यातील खडका येथील डेपोकरिता तीन ई-निविदा प्राप्त झाल्या आहेत. 

उर्वरीत १० डेपोसाठी ९ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत ई-निविदा सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.