८०% अनुदानावर कृषी अवजार बँकेची स्थापना, वाशिम जिल्हा अर्ज सुरू.Agriculture Department Farm Mechanization Scheme

८०% अनुदानावर कृषी अवजार बँकेची स्थापना, वाशिम जिल्हा अर्ज सुरू


शेतकऱ्यांना कृषी यंत्र अवजारांसाठी अनुदान देणारी महत्वाची अशी योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजना ( Agriculture Department Farm Mechanization Scheme )

राज्यातील चार आकांक्षित जिल्ह्यांमध्ये केंद्र शासनाद्वारे यापूर्वी कृषी कल्याण अभियान भाग-१ व भाग-२ मध्ये निवडलेल्या गावांमध्येच कृषी अवजारे बँक सुविधेचा लाभ देय राहणार आहे. या निवडक गावांतून ट्रॅक्टरची संख्या कमी प्रमाणात असलेली गावे, अल्प व अत्यल्प जमीनधारकांचे प्रमाण अधिक असलेली गावे व सध्या कृषी उत्पादकता वाढीस वाव असलेली गावे या योजनेसाठी पात्र असतील.

याच योजनेअंतर्गत वाशिम जिल्हा करिता कृषी अवजारे बँक स्थापण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

 वाशिम जिल्हयाचे मागासलेपण दूर होऊन इथला शेतकरी समृध्द झाला पाहिजे त्यांनी यांत्रिकी पध्दतीने शेती करुन तो आर्थिक दृष्टया संपन्न व्हावा यासाठी सन 2021-22 कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत कृषी कल्याण योजना अंमलबजावणी अंतर्गत कृषी अवजारे बँक स्थापण्यासाठी वाशिम तालुक्यातून मोहजा, सावळी, तांदळी शेवई, घोटा, सावरगांव बर्डे, कोकलगांव, गीव्हा, सोनखास, धानोरा (बु.) कोंडाळा (झामरे) या निवडक गावामध्ये कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी भाडेतत्वावर कृषी यांत्रिकीकरण सेवा सुविधासाठी कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 80 % किंवा जास्तीत जास्त ८ लाख रुपये अनुदानावर राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. 
त्यासाठी आत्माअंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गटाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. वाशिम तालुक्यात 2 अवजारे बँकेचे लक्षांक प्राप्त झाले आहे. प्राप्त अर्जामधून 2 लाभार्थ्यांची कृषी अवजारे बँकेसाठी उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम यांच्यास्तरावर निवड करण्यात येईल. 

अर्जासोबत संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, खरेदी करावयाचे यंत्र, अवजारे संचाचे दरपत्रक व परीक्षण पुरावा, आधारकार्ड संलग्न बँक खात्याच्या पासबुकाच्या पहिल्या पृष्ठांची छायांकित प्रत, संस्थेशी संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधिकृत केले असल्यास प्राधिकृत केल्याचे पत्र व संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड, फोटो असलेल्या ओळखपत्राची स्वयंसाक्षांकित परत सादर करणे आवश्यक आहे.
Aaa


संबंधित निवडक गावांमधून शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहाय्यता गट, कृषी विज्ञान मंडळ, शेतकरी उत्पादक गटांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह 15 फेब्रुवारी 2022 रोजी पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपले अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वाशिम येथे सादर करावे. असे आवाहन वाशिम कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.