दुधाळ गाई म्हशी गट वाटपासाठी अर्ज सुरु | gai mhashi gat vatap yojana 2022

दुधाळ गाई म्हशी गट वाटपासाठी अर्ज सुरु 

gai mhashi gat vatap yojana 2022

gai mhashi gat vatap yojana 2022
gai mhashi gat vatap yojana 2022



केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत सन २०२१ - २२  वर्षांसाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,तळोदा कार्यक्षेत्रातील अक्कलकुवा, अक्राणी व तळोदा तालुक्यातील आदिवासी महिला बचत गटांना दुधाळ जनावरांचे गट वाटपासाठी ( gai mhashi gat vatap yojana 2022 ) अनुसूचित जमातीच्या महिला बचत गटानी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी केले आहे.

या योजनेसाठी दिव्यांग, विधवा,  परितक्त्या स्त्रिया, अल्प भूधारक, महिलां यांनी  14 ते 23 जानेवारी 2022 या कालावधीत अर्ज सादर करावेत

gai mhashi gat vatap yojana 2022 योजनेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. 


या योजनेत संकरित गाय - एच.एफ. / जर्सी म्हैस - मुऱ्हा / जाफराबादी
देशी गाय – गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी या जातींच्या गाई म्हशी घेता येतील . 


• लाभार्थी निवडीचे निकष 

  •  लाभार्थी ही आदिवासी महिला बचत गटातील सदस्य असणे अनिवार्य राहिल.
  •  लाभार्थी सदस्य असलेला महिला बचत गट हा नोंदणीकृत असावा.
  •  महिला बचत गट ज्या यंत्रणे अंतर्गत स्थापन केलेला आहे त्यांचे बचत गट चालू स्थितीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
  • अपंग, विधवा, परितकत्या, अल्प भूधारक महिलांना प्राधान्य देण्यात यावे.
  • लाभार्थीकडे ओलिताखालील क्षेत्र व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक राहील. किमान २० गुंठे क्षेत्र सिंचनाखाली आवश्यक असून ७/१२ उतारा /८ उतारावर नोंद असणे आवश्यक आहे. तसेच सुखा चारा उपलब्ध करून द्यावा.
  • सदस्यांकडे किमान ४ गायीकरिता गोठ्यांची उपलब्धता असावी.
  • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचे लाभ देण्यात यावा.
  •  लाभार्त्याने किंवा त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी मागील ३ वर्ष सदर योजनेचा लाभ यापूर्वी आदिवासी विकास विभाग अथवा इतर कोणत्याही शासकीय विभाकडून घेतला नसल्याबाबत हमी पत्र सादर करणे आवश्यक राहील.
  • लाभार्त्याने दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण घेतलेले शासन मान्य संस्थेचे प्रमाणपत्र (उदा. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना, दीनदयाल कौशल्य विकास योजना,जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजगकता विकास केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, राष्ट्रीय कृत बँक, कृषी विद्यापीठ, आत्मा ई.) यांना प्राधान्य देण्यात यावे.

अनुदान लाभ 

1
संकरित गाईचा गट - प्रति गाय रु. ५५,०००/- प्रमाणे
१,१०,०००
2
प्रति गाय विमा रु. २,७५०/- (३ वर्षासाठी)
५,५००
3
वाहतुक खर्च प्रती लाभार्थी
४,५००
एकूण प्रकल्प किंमत
१,२०,०००


अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -

१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
२) * सातबारा (अनिवार्य)
३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
४) * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
५) * आधारकार्ड (अनिवार्य )
६) * बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य)
७) * अनुसूचीत जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (अनिवार्य)
८) * बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र (अनिवार्य)

९) ग्रामपंचायत नमुना नंबर ८ (असल्यास अनिवार्य)
१०) लाभर्थ्याची स्वत:ची जमीन नसल्यास भाडे तत्वावर जमीन घेतले बाबतचे समती पत्र सातबारा व ८ अ उतार्‍यासह (अनिवार्य)
११) रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
१२) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१३) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य)
१४) दिव्यांग असल्यास दाखला (अनिवार्य )
१५) वय - जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१६) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१७) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१८) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

अर्जदारांना  https://nah.mahabms.com/webui/home   या संकेत स्थळावर अर्ज करावे लागणार आहेत. 

अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कुठल्याही परिस्थितीत अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांकात बदल करू नये. 
अर्जदार ही फक्त महिलाच असली पाहीजे.

अर्जदार अनुसूचीत जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे व त्यास जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

योजने अंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर बंधपत्र लाभार्थीने देणे बंधनकारक राहील.

अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष पूर्ण असावे.
3. एका आधारकार्ड नंबर सोबत एकच मोबाइल नंबरची नोंदणी करता येईल याची नोंद घ्यावी.
4. अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराने स्वत:चा / वापरात असणारा मोबाइल नंबर भरणे आवश्यक आहे व दिलेल्या मोबाइल नंबर वर अर्जाची सद्यस्थिति एसएमएस द्वारे कळवण्यात येईल.
5. मोबाइल नंबर एकदा जतन केल्यानंतर तो पुढील प्रक्रियेत बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी.
6. अर्जदार आदिवासी महिला बचत गटातील व्यक्ती असणे गरजेचे आहे व जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
7. अर्जदाराने प्रथम स्वत:च्या तालुक्यास दिलेल्या योजनेचा लक्षांक पाहावा.
8. राशनकार्ड नुसार नमूद सदस्यांची नावे, संख्या तसेच आधारकार्ड नंबर माहिती अचूक नोंदवावी.
9. कुटूंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल.

10. माहिती पूर्णतः खरी असावी. माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास आपली निवड रद्द केली जाईल.
11. अर्जदाराचा फोटो (फोटो क्षमता ८० के.बी. पर्यंत असावी, "jpg, JPG, jpeg, JPEG, png, PNG" या प्रकाराचे फोटो निवडावे.)
12. अर्जदाराची स्वाक्षरी (स्वाक्षरी क्षमता ४० के.बी. पर्यंत असावी, "jpg, JPG, jpeg, JPEG, png, PNG" या प्रकाराचे फोटो निवडावे.)
योजनेबाबत अधिक माहितीसाठी 02564-210016 किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा.