आंबिया बहार फळ पीक विमा योजना २०२१ || falpik vima yojana 2021

आंबिया बहार फळ पीक विमा योजना २०२१ अर्ज सुरू 

restructured weather based crop insurance scheme maharashtra 2021


कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळ पिकांचे बाजारमूल्य अधीक 
असल्याने शेतकऱयांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळ पिकांचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास येणारा तोटाही मोठा असतो ही बाब 
विचारात घेऊन शेतकऱयांच्या फळ पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थिती अबाधीत राखण्याच्या दृष्ट्टीने मदत होईल. त्यासाठी राज्यात प्राधान्याने फळ पीक विमा ( fal pik vima yojana )  योजना राबविण्यात येते. 

 विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकांच्या उत्पादकते वर परिणाम होऊन मोठ्या प्रमानावर उत्पादनामध्ये घट येते. पर्यायाने शेतकऱयांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱयांना फळपीक  नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनरचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबविली जाते.
 पुनर्गचित  हवामान आधारीत फळपीक विमा योजनेत आंबिया बहारामध्ये ( ambiya bahar fal pik vima ) संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, प्रायोगिक तत्वावर स्ट्राबेरी व पपई या 9 फळा साठी 30 जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ घटक धरून ही योजना राबविली जाते.
सन 2021 - 22 या वर्षात याकरिता पीक विमा कंपन्या आणि अर्ज करण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

 फळनिहाय या विमा संरक्षित रक्कम व त्यामध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत ही ठरविण्यात आली आहे. 
अंतिम मुदत ही पुढीलप्रमाणे 

GR

द्राक्ष- 15 ऑक्टोंबर, 
डाळिंब  14 जानेवारी
मोसंबी 31 ऑक्टोंबर, 
केळी 31 ऑक्टोंबर, 
पपई 31 ऑक्टोंबर, 
संत्रा 30 नोव्हेंबर, 
काजू 30 नोव्हेंबर, 
कोकण आंबा 30 नोव्हेंबर, 
स्ट्रॅाबेरी 14 नोव्हेंबर 

फळ पीक विमा राबविण्याऱ्या जिल्हानिहाय विमा कंपन्या

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी : 
अहमदनगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबार

एचडीएपसी एर्गो  जनरल इन्शुरन्स : 
बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली वर्धा, ठाणे, हिंगोली, सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर

भारतीय कृषी विमा कंपनी : 
रायगड, बुलढाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद

पहा कसा भरायचा विमा खालील व्हिडीओ मध्ये 



Fal pik vima 2021