4 कोटी असंघटित कामगारांची ई – श्रम पोर्टलवर नोंदणी || E shram registration online

 केंद्र शासनाच्या माध्यमातून असंघटित कामगारांची E Srham  पोर्टल वर नोंदणी करून एक  डेटा बेस बनविला जात आहे जेणेकरून असंघटित कामगारांना सरकारी योजनांचा लाभ सहज मिळू शकेल. या E SHRAM online registration portal वर नोंदणी सुरु झाल्यापासून अवघ्या दोन महिन्यांपेक्षा कमी काळात, 4 कोटींपेक्षा अधिक कामगारांनी ईश्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे. 

याबाबत ची माहिती श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे मंत्री भूपेंद्र यादव यांनी द्विट द्वारे  दिली. 

भारताच्या इतिहासात 4 कोटींपेक्षा अधिक असंघटित कामगारांची ई – श्रम पोर्टलवर नोंदणी करणारा हा असंघटित कामगारांवरील भारताचा पहिला राष्ट्रीय डेटाबेस
यामध्ये कृषी आणि बांधकाम क्षेत्रातील कामगारांची मोठ्या संख्येने नोंदणी झाली आहे. 


असंघटित कामगारांना ई – श्रम मध्ये नोंदणी केल्यास  सरकारी योजनांचा लाभ सहज मिळू शकणार आहे.
बांधकामवस्त्रोद्योगमासेमारीगिग आणि प्लॅटफॉर्म(ई-कंपन्या)  कामरस्त्यावरील विक्रीघरगुती कामशेती आणि संलग्नवाहतूक क्षेत्र अशा विविध व्यवसायातील कामगारांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे. यापेकी काही क्षेत्रांमध्ये स्थलांतरित कामगारांचा देखील समावेश आहे. स्थलांतरित कामगारांसह सर्व असंघटित कामगार आता ईश्रम पोर्टलवर केलेल्या नोंदणीच्या माध्यमातून विविध सामाजिक सुरक्षा आणि रोजगारावर आधारित योजनांचा लाभ घेऊ शकतात. 
कामगारांना पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी त्यांच्या जवळच्या सीएससीला भेट देण्यास प्रोत्साहित केले जाते आणि या योजनेचा लाभ त्यांनी घ्यावाजेणेकरून विविध कल्याणकारी कार्यक्रम राबविताना अखेरच्या व्यक्तीपर्यंत ते पोचविणे सहज शक्य होऊ शकेल.
अशी करा आपली नोंदणी 

सविस्तर माहिती साठी हा विडिओ नक्की पहा