या जिल्ह्यांचा २०२१ चा सोयाबीन विमा मंजूर, आगाऊ 25% वितरित होणार || kharip pik vima 2021


full video

पुणे जिल्ह्यातील इंदापूर व बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, भुईमुंग विमा मंजूर तर
लातूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २५% आगाऊ पीकविमा देण्याचे विमा कंपनीला निर्देश देण्यात आले आहेत.
सोयाबीनचे पीक फुलोऱ्यात असताना पावसात मोठा खंड पडल्याने सोयाबीनच्या संभाव्य उत्पादनात ५०% पेक्षा अधिक घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्पादनात ५०% पेक्षा अधिक घट अपेक्षित असल्यास एकूण अंदाजित पीकविमा रकमेच्या २५% रक्कम आगाऊ पीकविमा देण्याची तरतूद आहे. त्याच तरतुदीच्या आधारे  लातूर जिल्ह्यातील पिकविमाधारक शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकासाठी २५% आगाऊ नुकसानभरपाई देण्याच्या सूचना मा जिल्हाधिकारी यांनी पीकविमा कंपनीला दिल्या आहेत. तशी अधिसूचनाही निर्गमित करण्यात आली आहे. नियमाप्रमाणे १ महिन्याच्या आत शेतकऱ्यांना ही आगाऊ पीकविमा रक्कम मिळेल अशी अपेक्षा आहे.



याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील बारामती व इंदापूर तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत २५ टक्के आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे. याबाबत देखील  जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना नुकतीच जारी केली आहे.

इंदापूर तालुक्यातील तूर व सोयाबीन साठी सर्व शेतकऱ्यांना तसेच बारामती तालुक्यातील तूर, भुईमूग व सोयाबीन या पिकांचा विमा घेतलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांना पीकविमा योजनेच्या नियमानुसार आता आगाऊ रक्कम मिळणार आहे. 
तसेच इंदापूर तालुक्यातील सणसर व बारामती तालुक्यातील सुपा, लोणी भापकर, मोरगाव, करंजेपूल या महसूल मंडळातील बाजरी पिकाचा विमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे.
यांच्या संदर्भात तील २५% रक्कम देणेकरिता अधिसूचना जारी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती व इंदापूर तालुक्यात २१ जुलै ते २५ ऑगस्ट या कालावधीत २५ ते ३५ दिवसांंचा पावसाचा खंड पडल्याने जिल्हास्तरीय समितीची बैठक होऊन, बारामती व इंदापूर तालुक्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची अधिसूचना जारी केली आहे.