ठिबक व तुषार सिंचन लाभार्थ्यांना मिळणार 80% अनुदान
राज्यात २०१५-१६ पासून प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना (Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana pmksy ) राबवली जाते . या योजनेत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्याना देय ५५ टक्के अनुदान तर इतर शेतकर्यांना देय ४५ टक्के अनुदान दिले जाते.
मात्र याच बरोबर आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हे, अवर्षणप्रवण जिल्हे, आशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्याना देय ५५ टक्के अनुदानास २५ टक्के पूरक अनुदान देवून ८० टक्के अनुदान इतर शेतकर्यांना देय ४५ टक्के अनुदानास ३० टक्के पूरक अनुदान देवून एकूण ७५ टक्के अनुदान अनुज्ञेय आहे.
मात्र गेलेल्या दोन वर्षा पासून हे अनुदान निधीच्या अभावी दिलेले नव्हते .
आणि याच पूरक अनुदानासाठी निधी उभारण्यासाठी डेडिकेटेड मायक्रोइरिगेशन फंड अंतर्गत कर्ज घेण्याचा व त्यासाठी त्रिपक्षीय करार करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. याबाबत दिनांक ४ जुलै २०२१ रोजी पार पडलेल्या मंत्री मंडळ बैठकीत सूक्ष्म सिंचनासाठी पूरक अनुदान देण्यासाठी डेडिकेटेड मायक्रो इरिगेशन फंड अंतर्गत कर्ज घेवून फयीधी उअसरयुयभानिरण्यास मान्यता दिली आहे. आणि याच अनुषंगाने पुढील शासन निर्णय घेण्यात आला आहे.
शासन निर्णय
मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत सन 2019-20 व सन 2020 -21 या वर्षातील सूक्ष्म सिंचन पूरक अनुदानासाठी रक्कम अदा करण्यासाठी नाबार्ड कडून रुपये 533.15 कोटी रकमेच्या मर्यादे पर्यंत DMID अंतर्गत कर्ज घेण्यास मंजुरी देण्यात येत आहे.
Aa
GR येथे पहा
👇👇👇
या शासन निर्णयामुळे आता प्रलंबित शेतकऱ्यांना आता अनुदान मिळण्यास मदत होणार आहे.