शेतकऱ्यांना खुशखबर ! ईफको चा नॅनो युरिया महाराष्ट्रात दाखल

इफको ने विकसित केलेल्या द्रवरुप 'नॅनो यूरियाच्या' महाराष्ट्रातील खत वितरणाचा शुभारंभ आज कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.


ईफको नॅनो यूरीयाच्या महाराष्ट्राकडे येणाऱ्या ट्रकला कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. हा सर्व कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडला यावेळी नॅनो यूरीया शेतकऱ्यांसाठी आणि पर्यावरणासाठी फायदेशीर असल्याचं कृषीमंत्री यांनी सांगितलं आहे.
क्ससाव

इफकोच्या उत्पादनांमुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या या कंपनीनं महाराष्ट्रात येण्यासाठीचे आमंत्रण कृषीमंत्र्यांनी दिले. नव्या स्वरूपातील हे ‘ द्रवरूप खत ‘ पारंपारिक यूरियापेक्षा स्वस्त आणि हाताळण्यास सुलभ असून त्यामुळे प्रदुषण रोखण्यासही मदत होणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले.