विशेष प्रवर्गातील गरजू लोकांकरिता वैयक्तिक व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना सुरू

 विशेष प्रवर्गातील गरजू लोकांकरिता वैयक्तिक व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना सुरू !



वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील गरजू लोकांकरिता वैयक्तिक व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना सुरू झाल्या असून, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील उपरोक्त समाजातील सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील असावा.
लाभार्थी मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा.
वय 18 ते 50 वर्ष वयोगटातील गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 
एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 
यासाठी गरजू व्यक्तींनी महामंडळाच्या  http://www.vjnt.in/BeneficiaryRegistrations.aspx?LAN=mr-IN   या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीकरिता गृहनिर्माण भवन, खो.क्र.३३, कलानगर, बांद्रा (पू), मुंबई. दूरध्वनी क्रमांक ०२२- २५४२८९०७ येथे संपर्क साधावा, असे आवाहन  वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मुंबई शहर व उपनगर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map