Krishi Mitra Bharti - सावधान 🚨 शेतकरी मित्र पदभरती साठी अर्ज करताय !

सावधान 🚨 शेतकरी मित्र पदभरती साठी अर्ज करताय ! 

Krishi Mitra Bharti

राज्यात कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधून देण्यासाठी कृषीमंत्र्यांनी प्रत्येक गावामध्ये एक शेतकरी मित्र नेमणूक करण्याची घोषणा केली होती. पुढे ही पदभरती झाली नाही किंवा पदभरती राबवण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून कुठल्या सूचनाही निर्गमित करण्यात आल्या नाही. 

मात्र या घोषणेचा गैरफायदा घेत राज्यात सध्या कृषी मित्र भरतीच्या नावाखाली सोशल मीडिया वरती बोगस जाहिरातीद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. अशा प्रकारच्या कुठल्याही फसव्या जाहिरातीला बळी न पडण्याचं कृषी विभागाच्या माध्यमातून आव्हान करण्यात आला आहे.


राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत होणाऱ्या पदभरतीची जाहिरात ही केवळ कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा प्रसिद्धी माध्यमाद्वारे जाहिरात दिले जाते. सध्या कृषी मित्र पदभरतीच्या नावाखाली बोगस जाहिराती प्रसारित करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे अशा फसवणूक करणाऱ्या व्यक्ती विरोधात कृषी विभागांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

मात्र शेतकऱ्यांनी अशा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अप्रमाने जाहिराती वरती विश्वास ठेवू नये अर्ज शुल्क भरवण्यासाठी पाठवण्यात येणारे वैयक्तिक खाते क्रमांक मोबाईल नंबर किंवा त्याच्या संदर्भातील लिंक वरती विश्वास ठेवू नये या पदभरतीसाठी कुठल्याही पोर्टल वरती रक्कम किंवा वैयक्तिक माहिती भरू नये अशा प्रकारचा आव्हान कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. 

संशयास्पद जाहिराती अथवा संदेश आढळल्यास तात्काळ स्थानिक पोलीस प्रशासन किंवा संबंधित कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.




या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map