नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना अर्ज सुरू ! | Fair price shop license application

नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना अर्ज सुरू

Manifesto Approval of  new fair price shops 

 सांगली जिल्ह्यात अर्ज मागविले.


सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत वितरीत करण्यात येणा-या शिधावस्तु  शिधापत्रिका धारकांना सहजपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी अस्तित्वात असलेले शिधावाटप दुकाने काही कारणास्तव किंवा त्या क्षेत्रातील एकांकामध्ये वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात नवीन 47 रास्तभाव दुकाने मंजूर करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

तालुकानिहाय एकूण जाहीरनामे व कंसात गावांची नावे पुढीलप्रमाणे अन्न धान्य वितरण अधिकारी श्रेणी 2, सांगली – 4 (कवठेपिरान (दुकान संख्या-2), दुधगाव, नावरसवाडी. मिरज – 4 (मानमोडी, कळंबी, मल्लेवाडी, पाटगाव). तासगाव - 3 (नागेवाडी, तासगाव, तुरची). कवठेमहांकाळ – 5 (नागज (दुकान संख्या 2), कुंडलापूर, दुधेभावी, हरोली). जत – 8 (साळमाळगेवाडी, काशीलिंगवाडी, निगडी खुर्द, रेवनाळ, मायथळ, सालेकेरी, पाच्छापूर, पारधीवस्ती-पांडोझरी). आटपाडी – 5 (शेंडगेवाडी, बेरगळवाडी, गुळेवाडी, माळेवाडी, धावडवाडी). खानापूर-विटा -2 (कुसबावडे, देवनगर). कडेगाव – 2 (कोतीज, वांगरेठरे). पलूस – 1 (अनुगडेवाडी-अमणापूर). वाळवा – 9 (खरातवाडी, पेठ, येलुर, जक्राईवाडी, शिगाव, फाळकेवाडी, ईश्वरपूर (दुकान संख्या 2), उरूणवाडी). शिराळा – 4 (फकिरवाडी, खुंदलापूर, पत शिराळा, बांबवडे).

नविन रास्तभाव /शिधावाटप दुकानाकरीता, पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक संस्था), नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याअंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यांचे कडुन अर्ज मागविण्यात येत आहे. 

सदर रास्तभाव दुकानाचे परवाने मंजुर केलेल्या महिलांचे व्यवस्थापण महिला किंवा त्यांचे समुदयाव्दारे करणे आवश्यक राहील. तसेच संस्था, गट स्थानिक गावातील किंवा वार्डातील असणे आवश्यक आहे. सदर जाहिरनामे तलाठी कार्यालय (साजा), ग्रामपंचायत कार्यालय (चावडी), नगर पालीका क्षेत्र तहसिल कार्यालय येथे प्रसिध्द करण्यात आलेले आहे. 

ज्या संस्था/बचत गट यांना नविन रास्तभाव दुकानाकरीता अर्ज करावयाचा असेल त्यांना संबंधित तहसिल कार्यालयात अर्ज करणे आवश्यक राहील. इच्छुक संस्था, बचत गट यांचे अर्ज दिनांक 14 ऑगस्ट, 2025 पर्यत संबंधित तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागाकडे विहीत मुदतीत स्वीकारण्यात येतील. 

विहीत मुदतीनंतर प्राप्त अर्ज स्वीकारण्यात येणार नाही, याची सर्व संस्था, बचत गट यांनी नोंद घ्यावी. अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी यांची माहिती तहसिल कार्यालयात उपलब्ध आहे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

 सांगली जिल्हयातील कार्डधारकांची होणारी गैरसोय दूर करण्याकरीता सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेवून आजमितीस रद्द असलेली, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने  मंजूर करण्यात आली आहे. या दुकानांसाठी इच्छुकांनी 30 जुलैपर्यंत अर्ज संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मेनाक घोष यांनी केले आहे.

दुकान निवडी साठी प्राधान्यक्रम


१ पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था)

२. नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट,

३. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, ४. संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास

५. महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था

संबंधीतांनी अर्ज केल्यानंतर प्राधान्यक्रमानुसार रास्तभाव दुकान परवाने मंजूर केलेल्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायाव्दारे करणे आवश्यक राहील. प्राधान्य सूचीनुसार पंचायत / संस्था/ गटांची निवड करताना जेष्ठ, वर्धनक्षम व नियमित कार्यरत असलेल्या व अंतर्गत व्यवहार पारदर्शक व परतफेड चोख व नियमित असलेल्या व प्रतिवर्षी लेखापरिक्षण केलेल्या पंचायत / संस्था/गटास प्राधान्य देण्यात येईल.

नविन स्वस्तधान्य दुकान मिळणेकामी अर्ज केलेल्या पंचायत / संस्था/ गटांची आर्थिक स्थिती ही किमान ३ महिन्याचे धान्य उचलण्या इतकी सक्षम असावी.

अर्ज करताना अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.


१. पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था) यांचेसाठी ग्रामसभेचा ठराव, ग्रामपंचायतचा दुकान मागणी अर्ज, तेरीज पत्रक, ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेबाबत गटविकास अधिकारी यांचा दाखला.

२. पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्यसंस्था), नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास यांचे नोंदणी प्रमाणपत्र.

३. पंचायत / स्वयंसहायता गट/संस्था/ सार्वजनिक संस्था/ न्यास यांचे आर्थिक स्थितीबाबत कागदपत्र जसे बँक पासबुकची छायांकित प्रत व बँकेचे प्रमाणपत्र / बँक स्टेटमेंट.

४. व्यवसाय करावयाच्या जागेचे मालकीबाबत कागदपत्र, जागा भाड्याची असल्यास भाडेपत्र, घर, टॅक्स पावती, ७/२, जागेचे क्षेत्रफळ, व्यवसाय ठिकाणाचे क्षेत्रफळ चौ. फुटमध्ये.


५. बँकेकडून कर्ज घेतले असल्यास कर्जाचा तपशील व परतफेडीचे प्रमाणपत्र (बँकेचे) व कर्जाची नियमित परतफेड चालू असलेबाबत संबंधीत बँकेचे प्रमाणपत्र व कर्जाची परतफेड झाली असल्यास संबंधीत बँकेचे कर्ज पूर्ण फेड केल्याबाबतचे प्रमाणपत्र.

६. पंचायत /स्वयंसहायता गट /संस्था/ सार्वजनिक संस्था / न्यास यांचे वार्षिक लेखे व हिशोब सन २०१८-१९ पासून आजपर्यंत तपासणी केलेल्या संस्थेचा अहवाल. ७. पंचायत /स्वयंसहायता गट /संस्था/सार्वजनिक संस्था/ न्यास यांचे अध्यक्ष/उपाध्यक्ष / सचिव व सर्व सभासदांची नावे, पूर्ण पत्यासह.

८. पंचायत / स्वयंसहायता गट /संस्था/ सार्वजनिक संस्था/ न्यास यांचे मूळ व आजचे भागभांडवल व सध्या करीत असलेले व्यवसाय व कार्याची संपूर्ण माहिती. ९. रास्तभाव दुकान परवाना मिळण्याबाबत व व्यवसाय करण्यासाठी संमती दर्शविलेला पंचायत /स्वयंसहायता गट /संस्था/ सार्वजनिक संस्था / न्यास यांचा ठराव.


१०.पंचायत /स्वयंसहायता गट /संस्था/ सार्वजनिक संस्था / न्यास स्वस्त धान्य दुकान स्वतः एकत्रितरित्या चालवतील, कोणीही इतर व्यक्तीस अथवा संस्थेस चालविण्यास देणार नाही किंवा हस्तांतरीत करणार नाही याबाबत प्रतिज्ञापत्र.

११. भाडे तत्वावर दिल्या गेलेल्या जागेसंबंधी मूळ जागा मालकाचे विधीग्राह्य दस्तऐवज.

१२. पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे नावे अन्य कोठेही शिधावाटप दुकान कार्यान्वित नसल्याचे रु.१००/- च्या स्टँपपेपरवर प्रतिज्ञापत्र. (सदरची माहिती खोटी असल्याचे भविष्यात निदर्शनास आल्यास नियमाप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल)

१३. पंचायत /स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे सदस्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबत रु.१००/- च्या स्टँपपेपरवर प्रतिज्ञापत्र.

१४. स्वयंसहायता गटाचे सभासद दारिद्य रेषेखालील असल्यास शिधापत्रिका / ग्रामसेवकांचे पत्र / नगरपालिकेकडील पत्र .

जिल्हा ग्रामीणमधील स्वस्त धान्य दुकान परवाने मंजूरीसाठी खाली नमूद तालुकानिहाय गावी /ठिकाणी नवीन रास्तभाव दुकान देणेकामी जाहीरनामा प्रसिध्द करण्यात येत आहे.

उपरोक्त नमूद शासन निर्णयानुसार इच्छूक पंचायत/संस्था/गट यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधीत तहसील कार्यालयाकडे मुदतीत अर्ज सादर करावेत. 

PDF link

मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map