Recent Post

Popular Posts

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ३० सप्टेंबर ची मुदत; अन्यथा मानधन बंद || Niradhar Yojana 2026

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ३० सप्टेंबर ची मुदत; अन्यथा मानधन बंद

Divyang Yojana 2026

विविध विशेष सहाय्य योजनांच्या सर्व लाभार्थ्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी ह्यात प्रमाणपत्र आणि दिव्यांग लाभार्थ्यांनी वैश्विक ओळखपत्र वेळेत सादर करावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी वर्षातून एकदा ह्यात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांसाठी सरकारने बेनिफिशरी सत्यापन ॲप विकसित केले आहे. 

लाभार्थी स्वतःच्या मोबाईलवर हे ॲप डाऊनलोड करून ऑनलाइन पद्धतीने ह्यात प्रमाणपत्र मोफत सादर करू शकतात. स्वतःचा मोबाईल नसल्यास लाभार्थी आपल्या नातेवाईकांमार्फत किंवा गावातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायतमधील संगणक परिचालक, कर्मचारी यांच्या मदतीने हे काम पूर्ण करू शकतील. लाभार्थ्यांना सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सेवा केंद्रावर जाऊनही हे प्रमाणपत्र सादर करता येईल. येथे प्रक्रिया केल्यास 50 रूपये सेवा शुल्क द्यावे लागणार आहे. 

सामाजिक न्याय विभागाच्या नियमानुसार दिव्यांग लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्र प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. अनेक दिव्यांगांनी अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नसल्याची बाब लक्षात घेऊन, दिव्यांग सक्षमीकरण विभागाने या प्रक्रियेला दि. 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

या योजनांच्या पात्र लाभार्थ्यांनी कोणत्याही तांत्रिक अडचणी किंवा मानधनात खंड पडू नये, यासाठी बेनिफिशरी सत्यापन ॲपवरून ह्यात प्रमाणपत्र त्वरित नोंदवावे. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांनी वैश्विक ओळखपत्र सादर करावे.

राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सूचनांनुसार विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे यूडीआयडी कार्ड व आधार कार्ड संलग्नीकरण करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यात विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले वैश्विक ओळखपत्र (UDID Card), आधार कार्ड तसेच बँक खात्याची छायांकित प्रत तात्काळ संगणकीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर करावी.

राज्य शासनाने विशेष सहाय्य अनुदान योजनांअंतर्गत लाभ घेणाऱ्या, परंतु वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अशा लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येत आहेत. 

या योजनांमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांचाही समावेश असून, अलीकडे ‘युडीआयडी’ कार्ड अनिवार्य करण्यात आल्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे अनुदान थांबले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत, १ एप्रिल २०२६ पूर्वी या योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांना मुदतवाढ दिली आहे. संबंधित तहसीलदारांनी जुन्या वैद्यकीय प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वैश्विक ओळखपत्र कार्ड मिळवून देण्यासाठी आवश्यक समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

UDID Card eKYC Online Marathi | UDID Card Update Process 2026



या आदेशाचे पालन न करता संबंधित कागदपत्रे सादर न केल्यास होणाऱ्या गैरसोयीस तसेच अनुदान बंद झाल्यास संबंधित लाभार्थी स्वतः जबाबदार राहतील, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

तरी सर्व संबंधित दिव्यांग बांधवांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करून योजनांचा लाभ अखंडित ठेवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे