Recent Post

Popular Posts

11th Admission 2026 गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत; विद्यार्थ्यांना दिलासा

11th admission 2026 Maharashtra 

राज्यात शैक्षणिक वर्ष 2026 27 अंतर्गत होणाऱ्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रिये संदर्भात एक महत्त्वाचा आणि दिलासादायक असा निर्णय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. 

आता अकरावी प्रवेशासाठी मूळ गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे अर्थात प्रवेश प्रक्रियेच्या वेळी गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला देण्यात सूट देण्यात आले आहे.

राज्यात दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अद्यापही अनेक विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका किंवा शाळांच्या माध्यमातून शाळा सोडल्याचा दाखला देण्यात आलेला नसल्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली होती. 

याच पार्श्वावरती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र यांच्या माध्यमातून सर्व शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी व कनिष्ठ महाविद्यालयांना एक पत्र काढून सूचना जारी केले आहेत. 

या पत्रकानुसार विद्यार्थ्यांना 2026 27 च्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत नियमित फेरी क्रमांक एक सुरू असून 29 मे 2026 रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. 

या यादीतील विद्यार्थ्यांना अकरावी मध्ये प्रवेश निश्चित करत असताना मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्यपणे सादर करण्याचे आठ ही तात्पुरती शेती करण्यात आल्याच्या सूचना या परिपत्रकातून देण्यात आलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना संबंधित कागदपत्र अद्याप प्राप्त झालेले नाहीत. 

त्यांच्याकडून गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध होण्यात सादर करण्यात येईल असे हमीपत्र घेऊन त्यांचा प्रवेश निश्चित करावा अशा सूचना देण्यात आलेले आहेत. 

यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये निर्माण होणारा एक मोठा अडथळा दूर झालेला आहे आणि राज्यातील अकरावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे.