हमीभावाने कापूस विक्रीदरम्यान सातबारा उताऱ्यावर ठेवा लक्ष || Cotton MSP procurement

हमीभावाने कापूस विक्रीदरम्यान सातबारा उताऱ्यावर लक्ष देण्याचे प्रशासनाचे आवाहन.

Cotton MSP Procurement 


खरीप हंगाम 2025-26 मधील कापूस खरेदीच्या अनुषंगाने भारतीय कापूस निगम लिमिटेड (सीसीआय) मार्फत हमी दराने कापसाची खरेदी दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पासून नियमितपणे सुरू आहे.

हमीभावाने कापूस खरेदी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांकडून सातबारा उतारा ही आवश्यक कागदपत्र आहेत.

या सातबारा उतारा कागदपत्रसंदर्भात शेतकरी बांधवांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हमीभावाने कापूस खरेदीच्या वेळी सातबारा उताऱ्याचा वापर करण्यात येत असल्याने कोणत्याही अडतदार, व्यापारी, एजंट किंवा इतर मध्यस्थ व्यक्तीस आपला सातबारा उतारा देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सातबारा उतारा इतरांच्या हाती गेल्यास त्यामध्ये बोगस संपादन (एडिटिंग) करून गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला सातबारा उतारा केवळ अधिकृत खरेदी केंद्रावर आणि अधिकृत कर्मचाऱ्यांनाच सादर करावा

शेतकरी बांधवांनी या सूचनांचे पालन करून सुरक्षित व पारदर्शक कापूस खरेदी प्रक्रियेस सहकार्य करावे, असेही  प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.