पोकरा योजनेचं अनुदान आल, निधी वितरित | Pocra yojna 2024

नानाजी देशमुख कृषि संजीवनी ( Pocra yojna) प्रकल्पासाठी निधी वितरीत.

Pocra yojna 2024


Pocra yojna

हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ, मराठवाड्यातील ४६८२ गावे (विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्टयातील ९३२ गावांसह) तसेच जळगाव जिल्ह्यातील ४६० गावे अशा एकूण ५१४२ गावांमध्ये सन २०१८ पासून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने रू.४००० कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पामध्ये निवडण्यात आलेल्या ५१४२ गावांपैकी विविध कारणांमुळे प्रकल्पाची अंमलबजावणी करणे शक्य नसलेल्या ६४ गावांऐवजी नाशिक जिल्हयातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावांचा समावेश या प्रकल्पामध्ये मान्यता देण्यात आली आहे.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाची एकूण किंमत ६०० दशलक्ष डॉलर्स (रु.४००० कोटी) असून त्यामध्ये जागतिक बँकेचा हिस्सा ७० टक्के (रु.२८०० कोटी) (४२० दशलक्ष डॉलर्स) व राज्य शासनाचा हिस्सा ३० टक्के (रु.१२०० कोटी)( १८० दशलक्ष डॉलर्स) आहे. राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर जागतिक बँकेचा निधी प्रतिपुर्तीच्या स्वरुपात प्राप्त होतो.डॉलर्स व रुपयाच्या विनिमय दरात झालेल्या फरकामुळे प्रकल्प मूल्य रु.४६९० कोटी इतके होते. तर प्रकल्पावरील निश्चित दायित्वामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च रु. ५४६९ कोटी इतका होणार आहे.

प्रकल्पाच्या मूळ रु.४००० कोटी रकमेमध्ये डॉलर्सच्या विनिमय दरानुसार झालेल्या वाढीमुळे रु.६९० कोटी अतिरिक्त निधी उपलब्ध होऊ शकतो यामध्ये जागतिक बँकेचे रु. ४८३ कोटी कर्ज व राज्य हिस्सा रु.२०७ कोटी इतका असेल, हा रु.६९० कोटी अतिरिक्त निधी तसेच प्रकल्पाचे उर्वरित दायित्व पूर्ण करण्यासाठी रु.७७९ कोटी निधी याप्रमाणे एकूण रु. १४६९ कोटी निधी राज्य शासनाच्या एकत्रित निधीतून उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या मूळ रु.४००० कोटी (६०० दशलक्ष डॉलर्स) व्यतिरिक्त डॉलर्सच्या विनिमय दरातील फरकामुळे झालेली रु.६९० कोटी (रुपये सहाशे नव्वद कोटी फक्त) वाढ, त्याचप्रमाणे प्रकल्पावर निर्माण झालेल्या निश्चित दायित्वासाठी उपलब्ध करुन द्यावयाचा अतिरिक्त रु.७७९ कोटी (रुपये सातशे एकोणऐंशी कोटी फक्त) निधी याप्रमाणे एकूण रु. १४६९ कोटी रुपये चौदाशे एकोणसत्तर कोटी फक्त) खर्चास व त्यामुळे प्रकल्पाच्या एकूण रु.५४६९ कोटी रुपये पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी फक्त) इतक्या सुधारित किंमतीस मान्यता देण्यात येत आहे.


निधी शेतकऱ्यांना तात्काळ वर्ग करण्याचे शासन आदेश 

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) सन २०२२-२३ साठी विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी 203 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली असून अशा प्रकारचा शासन निर्णय हि घेण्यात आला आहे. 

हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील ४२१० गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील ९३२ गावे अशा एकूण ५१४२ गावांमध्ये ६ वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे रु.४००० कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. 

तसेच दिनांक १७ फेब्रुवारी, २०२२ च्या शासन निर्णयान्वये नाशिक जिल्हयातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावांचा समावेश या प्रकल्पामध्ये करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये पुर्ण झालेल्या कामाच्या बाबींची देयके अदा करण्याकरिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प यांचेकडून संदर्भ क्रमांक ४ च्या पत्रान्वये प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्यानुसार सन २०२२-२३ या अर्थसंकल्पिय तरतूदीतून रु.२०३.०९ कोटी निधी वितरीत

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत ( Pocra yojna 2022 ) वैयक्तिक लाभाच्या बाबी (शेततळी,ठिबक संच,फळबाग लागवड, इलेक्ट्रिक मोटर इ.) ,शेतकरी गटांना लाभ (शेतीसाठी सोयीसुविधा व कृषि प्रक्रिया उद्योग) तसेच पाण्याच्या ताळेबंदावर आधारित मृद व जलसंधारणाची कामे अशा विविध बाबींचा समावेश आहे.
GR येथे पहा 

👇

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202406141517475301....pdf


सन 2023-24 करिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.168.1250 कोटी निधी वितरित

सन 2023-24 करिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.441.63 कोटी निधी वितरित करणेबाबत.

सन 2023-24 करिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु. 338.10 कोटी निधी वितरित करणेबाबत.

सन 2023-24 करिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.116.808 कोटी निधी वितरित करणेबाबत.

सन 2023-24 करिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु. 117 कोटी निधी वितरित करणेबाबत.

सन 2023-24 करिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.88.40 कोटी निधी वितरित करणेबाबत.

सन 2023-24 करिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु. 81.80 कोटी निधी वितरित करणेबाबत.

सन 2022-23 मध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.150 कोटी निधी वितरित करणेबाबत.

सन 2022-23 मध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.203.09 कोटी निधी वितरित करणेबाबत.

सन 2022-23 मध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.293.38 कोटी निधी वितरित करणेबाबत.

सन 2022-23 मध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.200 कोटी निधी वितरित करणेबाबत.सन 2022-23 करिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.156.32 कोटी निधी वितरित करणेबाबत.

सन 2022-23 करिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.265.54 कोटी निधी वितरित करणेबाबत.

सन 2021-22 मध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.25.77 कोटी


सन 2021-22 मध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.600 कोटी निधी वितरित करणेबाबत.

या शासन निर्णयानुसार नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाकरिता ( Pocra yojna 2022 ) बाह्य हिश्श्याचा रु.४२० कोटी  व राज्य हिश्श्याचा रु.१८० कोटी असा एकूण ६०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येत आहे.  हा निधी पोकरा ( हवामान अनुकूल कृषी विकास प्रकल्प ) अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कामे पूर्ण केली असतील त्यांना तात्काळ वर्ग करावा, असे निर्देश हि यात देण्यात आले आहेत. 

हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील ४ हजार २१० गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील ९३२ गावे अशा एकूण ५ हजार १४२ गावांमध्ये ६ वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे रू. ४००० कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प ( Pocra yojna 2022 ) राबविण्यात येत आहे.

 या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता  सन २०२१-२२ मध्ये एकूण रु.७३०.५३ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून निधी खर्ची पडलेला आहे. प्रकल्पांतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनी शेतकरी गट/कंपन्यांनी व ग्राम कृषी संजीवनी समितीने केलेल्या कामापोटी द्यावयाच्या अर्थसहाय्यासाठी ३३ अर्थसहाय्य या उद्दिष्टाकरिता बाह्य हिस्सा व राज्य हिस्सा असा एकूण रु.६०० कोटी अतिरिक्त निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झाला आहे, 

यामुळे आता गेल्या सहा महिन्यापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.