आगामी निवडणुकांसाठी प्रभाग निहाय मतदार याद्या प्रसिद्ध ! Voter list 2022

आगामी निवडणुकांसाठी प्रभाग निहाय मतदार याद्या प्रसिद्ध !

पहा ट्रू- व्होटर मोबाईल ॲप वर आपले नाव 

true voter application


Voter list 2022

राज्यातील विविध 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. या मतदार याद्यांमधील मतदारांची नावे तपासण्याची आणि त्याबद्दल काही हरकती असतील तर त्या दाखल करण्याची सुविधा ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारे ( true voter application ) उपलब्ध करून देण्यात आली आहेअशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिलीआहे. 

राज्यात बृहन्मुंबईठाणेनवी मुंबईकल्याण- डोंबिवलीउल्हासनगरवसई- विरारपुणेपिंपरी- चिंचवडसोलापूरकोल्हापूरनाशिकअकोलाअमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 

या मतदार याद्या प्रकाशित करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात आल्या आहेत. 

या प्रकाशित करण्यात आलेल्या यादीवर काही हरकती असतील तर नागरिकांना 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. 

या प्रकाशित करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित महानगरपालिकेत किंवा त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 

या मतदार यादीत आपले नाव तपासता येईल. ती सुविधा आता ट्रू- व्होटर मोबाईल ॲपमध्येही उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

विधानसभा मतदारसंघाची यादी प्रभागनिहाय विभाजित करताना त्यात नवीन नावांचा समावेश करणे किंवा नावे वगळण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही. 

एखाद्या मतदारास चुकीचा प्रभाग वाटप झाल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही महानगरपालिकेच्या मतदार यादीत ( voter list  maharashtra ) नाव नसल्यासहरकत दाखल करता येते. या हरकतींचा लवकर निपटारा होण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने एक नमुना अर्ज तयार केला आहे. 

त्याद्वारे आपण हरकत घेऊ शकतो आणि ट्रू- व्होटर मोबाईल ( true voter app ) ॲपद्वारेही सोप्या पद्धतीने हरकत दाखल करता येणार आहे.