सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना योजनेसाठी अर्ज सुरु | Poultry Development blocks application 2022

सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना योजनेसाठी अर्ज सुरु 

Poultry Development blocks application parbhani 2022

भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची सन २०१८-१९ पासुन टप्याटप्याने स्थापन करण्यास शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे. 

महाराष्ट्र राज्यातील ३०२ तालुक्यामध्ये प्रति तालुका एक या प्रमाणे ५० % अनुदानावर सार्वजनिक - खाजगी असुन तिसऱ्या  टप्यात सन २०२२-२३ मध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गातुन मानवत व सेलु तसेच पालम तालुक्यासाठी सर्वसाधारण महिला व पुरुष एकत्रित अर्जातुन प्रति तालुका एक याप्रमाणे गट स्थापन करण्यात येणार आहे.

 
 योजनेचे निकष, अटी - शर्ती आणि अर्जाचा विहित नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार) , पंचायत समिती मानवत / सेलु / पालम यांचच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. 

योजनेअंतर्गत १८ ते ६० वर्ष वयोगटातील अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची २५०० चौफुट जागा उपलब्ध असावी तसेच त्या ठिकाणी दळण - वळणाची, पाण्याची व विद्युतीकरणाची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक राहील. 

अर्जासोबत आधारकार्ड , सातबारा , ८-अ चा उतारा आणि ग्राम पंचायत नमुना नं -८ , कुक्कुट पालनाचे प्रशिक्षण प्रमाणपत्रासह इतर अनुषंगीक कागदपत्रे जोडणे आवश्यक राहील. 

सन २०२२-२३ मध्ये फक्त मानवत / सेलु / पालम तालुक्यांतील प्रत्येकी एकाच लाभधारकास या योनेचा लाभ देण्यात येणार असल्याने मानवत / सेलु / पालम तालुक्यातील इच्छुक अर्जदारांनीच या योजनेसाठी संबंधित पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडे दि. ३० जुन २०२२ पर्यंत अर्ज सादर करण्यात यावेत. 

सर्वसाधारण महिला प्रवर्गातून मानवत व सेलू तसेच पालम तालुक्यासाठी सर्वसाधारण महिला व पुरुष एकत्रित अर्जातुन प्रति तालुका एक या प्रमाणे गट स्थापन करण्यात येणार आहे. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map