प्रधानमंत्री स्वनिधी योजना, ऑनलाईन अर्ज सुरू | PM Svanidhi yojana

प्रधानमंत्री स्वनिधी योजना, ऑनलाईन अर्ज सुरू

५० हजार रुपयांची कर्ज योजना

PM Svanidhi yojana 2022
देशातील फेरीवाल्यांसाठी/ पथविक्रेत्यांसाठी केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री स्वनिधी योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना ₹१०,००० सुक्ष्म-पतपुरवठा करण्यात येतो. या योजनेची राज्यातील सर्व महत्वाच्या शहरात अंमलबजावणी करण्यात येत आहे. 

तरी शहरातील फेरीवाल्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना 10 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 



पात्र फेरीवाल्यांनी/ पथविक्रेत्यांनी सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जावून आपला अर्ज भरावा. 

ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी या योजनेअंतर्गत घेतलेल्या 10 हजार रुपये कर्जाची परतफेड सुरळीत केली आहे, अशा लाभार्थ्यांनी बँकेत जाऊन पहिले कर्ज भरल्याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र घेवून 20 हजार रुपये कर्ज मिळण्यासाठी सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जावून आपला अर्ज ऑनलाईन भरावा. 




अर्जाची प्रत बँकेत सादर करुन 20 हजार रुपये भांडवली कर्ज योजनेचा लाभ बँकामार्फत उपलब्ध करुन घ्यावा.