राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण मसुदा तयार | Turmeric_Policy_Draft

राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण मसुदा तयार 

Turmeric Policy Draftहळद लागवडीपासून प्रक्रिया व विक्री पर्यंत शेतकरी, प्रक्रीयाकार तसेच निर्यातदारांना येणाऱ्या अडचणी विचारात घेता महाराष्ट्र राज्याचे हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चितीकरीता शासनाला सल्ला देण्यासाठी कृषि व पदुम विभाग शासन निर्णय क्र.हसंप्र-2020/प्र.क्र.165/9अे, दि.07/09/2020 अन्वये श्री.हेमंत पाटील, लोकसभा सदस्य, हिंगोली लोकसभा मतदार संघ, यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीद्वारे महाराष्ट्रातील हळद पिकाच्या लागवड, प्रक्रीया व निर्यात यामधील समस्या व त्यावरील उपाय योजनांच्या अनुषंगाने राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण मसुदा तयार करण्यात आला आहे. 

हळद संशोधन व प्रक्रिया धोरण मसुदा सर्वसामान्यांच्या सुचनांकरीता कृषि विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला असून यासंबंधीत शेतकरी, संशोधक, उद्योजक, निर्यातदार, ग्राहक यांनी आपल्या सुचना  phytocell@gmail.com  या ईमेलवर अथवा कृषि उपसंचालक, फलोत्पादन-3, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, कृषिभवन जवळ, शिवाजीनगर, पुणे-411 005 या पत्त्यावर दि.07 मार्च, 2022 अखेर पर्यंत पोहोचतील या बेताने पाठविण्यात याव्यात.असे सहसंचालक फलोत्पादन कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य  अशोक किरनळळी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.