माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना | Majhi Kanya Bhagyashree sudharit Yojana

माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना 

Majhi Kanya Bhagyashree sudharit Yojana

Majhi Kanya Bhagyshri

Majhi Kanya Bhagyshri 


महाराष्ट्रात  मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे अशी अनेक उद्दिष्ट घेऊन  "माझी कन्या भाग्यश्री" ( Majhi Kanya Bhagyshri  ) ही योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.


काय आहे योजना हे  पहा खालील Video मध्ये 

लाभार्थी प्रकार 1 :  ज्या कुटुंबात एकुलती १ मुलगी आहे व मातेने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे.

लाभार्थी प्रकार 2 : ज्या कुटुंबात २मुली आहेत आणि मातेने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे.

१  मुलगी लाभार्थ्यास मिळणारे फायदे

 • एका मुलीनंतर आईवडिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून मुलीच्या नावे ५००००/- रक्कम थेट बँकेत ठेव योजनेत जमा केली जाते.
 • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेवरील फक्त व्याज मुलीच्या वयाच्या ६ वर्ष पूर्ण झाल्यावर काढता येईल.
 • मुलीचे  वय १२ वर्ष पूर्ण झाल्यावर पुढील व्याज काढता येईल
 • मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावर या योजनेतील मुद्दल आणि उर्वरित व्याज दोन्ही काढता येईल.

२ मुली लाभार्थ्यास मिळणारे फायदे

 • २ मुलीनंतर आई-वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून मुलीचे नावे प्रत्येकी २५०००/- रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ठेव योजनेत जमा केली जाते.
 • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या २५०००/- रकमेवरील फक्त व्याज मुलीचे वय ६  वर्ष पूर्ण झाल्यावर काढता येईल.
 • मुलीचे  वय १२ वर्ष पूर्ण झाल्यावर पुढील व्याज काढता येईल
 • मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावर या योजनेतील मुद्दल आणि उर्वरित व्याज दोन्ही काढता येईल.

माझी कन्या भाग्यश्री योजना नियम व अटी

MKBY terms & condition

 • या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी मातेने / पित्याने कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा दाखला योजनेचा लाभ घेण्यापूर्वी अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे.
 • या योजनेला लाभ फक्त १ ऑगस्ट २०१७ रोजी व त्यानंतर जन्मलेल्या मुलींसाठीच असेल.
 • १ ऑगस्ट २०१७ पूर्वी जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • जर एखाद्या आई-वडिलांना पहिली मुलगी असेल व दुसरा मुलगा असेल किंवा पहिला मुलगा व दुसरी मुलगी असेल आणि त्यांचा जन्म जरी १ ऑगस्ट २०१७ नंतर झाला असेल तरी त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • जर एखाद्या कुटुंबात पहिले अपत्य मुलगी व दुसरे अपत्य मुलगी असेल आणि जर तिसरे अपत्य मुलगी झाली असेल तर त्या तिसऱ्या मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही उलट पहिल्या व दुसऱ्या मुलींना या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ रद्द करण्यात येईल.
 • या योजनेअंतर्गत कुटुंबातील फक्त २ मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
 • लाभार्थ्याचे वडील महाराष्ट्र राज्याचा मुळ रहिवाशी असणे अनिवार्य आहे.
 • मुदत ठेव रक्कम व त्यावरील जमा व्याजाची रक्कम मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावरच काढता येईल परंतु लाभार्थी मुलगी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच ती अविवाहित असणे आवश्यक आहे.
 • दुसऱ्या प्रसुती वेळेस जर मातेने जुळ्या मुलींना जन्म दिला तर त्या दोन्ही जुळ्या मुली सदर योजनेसाठी पात्र असतील.
 • बालगृहातील अनाथ मुली देखील सदर योजनेसाठी पात्र असतील.
 • जर एखाद्या कुटुंबाने एखादी मुलगी दत्तक घेतली असेल तर ती मुलगी देखील सदर योजनेचा लाभ घेऊ शकेल परंतु दत्तक घेतलेल्या मुलीचे वय ० ते ६ वर्षे इतके असावे तसेच दत्तक घेतलेल्या मुलीच्या पालकांना देखील सदर योजनेचे नियम व अटी लागू असतील.
 • सदर योजना आधार कार्ड सोबत लिंक करण्यात येईल.
 • मुदतीपूर्वी म्हणजेच मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होण्याअगोदरच जर मुलीचे लग्न झाले किंवा मुलगी दहावीत नापास झाली किंवा एखाद्या कारणामुळे मुलीचे नाव शाळेमधून काढून टाकण्यात आले तर अशा परिस्थितीत सदर योजनेचा लाभ लाभार्थ्यांस घेता येणार नाही.
 • या योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या मुलीचा मृत्यू जर एखाद्या नैसर्गिक कारणामुळे झाल्यास मुलीच्या नावावरील पूर्ण रक्कम मुदत संपल्यानंतर पालकांना देण्यात येईल.
 • प्रत्येक लाभार्थी मुलींसाठी स्वतंत्र खाते बँकेत उघडण्यात येईल.
 • मुलीच्या नावे मुदत ठेव रक्कम जमा झाल्यावर लाभार्थ्यास बँकेकडून गुंतवणूक प्रमाणपत्र  देण्यात येईल.
 • मुदत ठेव पद्धतीवरील व्याज बँकेच्या दरानुसार देण्यात येईल.
 • पहिल्या मुलीच्या जन्मानंतर १ वर्षाच्या आत आई-वडिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे या योजनेअंतर्गत बंधनकारक राहील जर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया १ वर्षानंतर केल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • सदर योजना सर्व गटातील कुटुंबातील फक्त २ मुलींना लागू असेल.
 • दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर, ६ महिन्याच्या आत मुलीच्या आई-वडिलांना कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहील.
 • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ७.५ लाखापर्यंत असणे आवश्यक आहे.
 • अर्ज करतेवेळी मुलीचे जन्म प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
 • सदर योजनेअंतर्गत मुलीच्या वयाच्या १८ वर्षानंतर LIC कडून जे १ लाख रुपये मिळणार आहेत त्यापैकी किमान १००००/- रुपये तरी मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करणे बंधनकारक राहील जेणेकरून या कौशल्याच्या मदतीने मुलीला रोजगार मिळून कायमस्वरूपी उत्पन्न मिळेल.

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महत्वपूर्ण अशा "माझी कन्या भाग्यश्री"  (Majhi Kanya Bhagyashree sudharit Yojana ) योजनेसाठी सन २०२१ - २२  या आर्थिक वर्षासाठी ८ कोटी ५० लाख निधी वितरणास आज एक शासन निर्णय घेऊन शासन मान्यता देण्यात आली आहे 


या संबंधीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून हा शासन निर्णय आपण खालील  पाहू शकता 

माझी कन्या भाग्यश्री या योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्याबाबत.


Majhi Kanya Bhagyshri  अर्जाची लिंक