इलेक्ट्रिक वाहन खरेदी अनुदान योजना || electric vehicle dhoran maharashtra 2022

 इलेक्ट्रिक वाहन खरेदी अनुदान योजना

electric vehicle dhoran maharashtra 2022

वातावरनात होणारे बदल, वाढते प्रदूषण  नियंत्रणात ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून २५ जुलै २०२१ पासून इलेक्ट्रीक वाहन धोरण २०२१ लागू करण्यात आलेले आहे. 


electric vehicle dhoran maharashtra

electric vehicle dhoran maharashtra



या धोरणाच्या अंतर्गत इलेक्ट्रीक वाहन (battery Electric vehicles)  करण्यासाठी इच्छुक खरेदीदार यांना वाहनांच्या बॅटरी च्या क्षमतेनुसार अनुदान  दिले जाणार आहे. 




इलेक्ट्रीक वाहन धोरणांतर्गत electric vehicle dhoran maharashtra) 31 डिसेंबर 2021 पर्यंत असलेली त्वरीत नोंदणी सूटची मर्यादा दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर दि. 1 जानेवारी 2022 पासून शासकीय व निमशासकीय यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत खरेदी करण्यात येणारी वाहने बॅटरी इलेक्ट्रीक वाहने असावीत. तसेच दि. 1 एप्रिल 2022 पासून शासकीय वापरासाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणारी सर्व वाहने ही बॅटरी इलेक्ट्रीक असतील, असेही यासंदर्भातील शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

Gr

राज्याने 23 जुलै 2021 च्या शासन निर्णयानुसार इलेक्ट्रीक वाहन धोरण ( electric vehicle dhoran maharashtraजाहीर केले आहे. इलेक्ट्रीक वाहन खरेदीस चालना मिळावी म्हणून या धोरणामध्ये  विविध प्रकारची प्रोत्साहने जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये त्वरीत नोंदणी सूट या प्रोत्साहनाचा समावेश आहे. तसेच दि. 1 एप्रिल 2022 पासून परिचालित होणारी सर्व शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत व शासनाच्या निधीमधून खरेदी करण्यात येणारी वाहने बॅटरी इलेक्ट्रीक वाहने असावीत असा निर्णय घेण्यात आला आहे.

इलेक्ट्रीक वाहन धोरण electric vehicle dhoran maharashtraजाहीर झाल्यानंतर या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित असलेले विविध विभाग व यंत्रणांशी समन्वय साधून अंमलबजावणी करण्यात येत आहे. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव आतापर्यंत अपेक्षित नोंदणी होऊ शकली नाही. त्यामुळे त्वरीत नोंदणी सूटचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच इलेक्ट्रीक वाहन खरेदीस प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने शासकीय व निमशासकीय यंत्रणांमार्फत जानेवारी ते मार्च 2022 या कालावधीत खरेदी करण्यात येणारी वाहने ही बॅटरी इलेक्ट्रीक वाहने असणे आवश्यक असल्याने धोरणात तसा बदल करण्यात आला आहे.

राज्यात 25 जुलै 2021 रोजी धोरण लागू होऊन सुद्धा अजूनही शोरूम कंपन्यांच्या माध्यमातून अनुदानासाठी अर्ज घेतले नव्हते. 
कारण या धोरणाच्या मार्गदर्शक सूचना तेव्हा मंजूर झाल्या नव्हत्या.
 महाराष्ट्राचे इलेक्ट्रीक व्हेईकल प्रोत्साहन धोरण- 2018 हे संदर्भाधीन शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आले आहे. धोरणाच्या तरतुदींनुसार बॅटरी इलेक्ट्रीक व्हेईकल ( BEV) च्या खरेदीदारांसाठी आर्थिक प्रोत्साहन अनुदेय केली आहेत. तसेच या धोरणाच्या तरतुदीनुसार आर्थिक प्रोत्साहन वाटप करण्यासाठी नवीन सूचना देण्यात आल्या आहेत. 


 इलेक्ट्रीक वाहन खरेदी वरती अनुदान मिळवण्यासाठी  अर्ज कसा करायचा हे पाहूया..

या साठी लाभार्थ्याने रजिस्टर आणि ऑनलाइन फॉर्म di.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर भरायचा आहे.
या साठी नवीन पोर्टल सुरू झाल्यानंतर त्यावर अर्ज भरले जातील. 
या अर्जासोबत काही कागदपत्रे, स्कॅन कॉपी लागणार आहेत.


प्रोत्साहन फक्त बॅटरी इलेक्ट्रिक (Battery electric) वाहनांसाठी (BEV) साठी असेल जे महाराष्ट्रात पहिल्यांदा नवीन वाहन म्हणून विकले जाते आणि महाराष्ट्र राज्याच्या आरटीओकडे बीईव्ही (BEV) म्हणून नोंदणीकृत असते. पॉलिसी कालावधी दरम्यान OEM प्रोत्साहन (बीईव्हीच्या प्रत्येक श्रेणीमध्ये म्हणजे दोन, तीन, चारचाकी आणि ई – बस) साठी पात्र असतील. वाहनाच्या बॅटरी क्षमतेच्या आधारावर सबसिडी दिली जाणार (INR/KWW).


प्रस्ताव दिल्यानंतर 15 दिवसाच्या कालावधीमध्ये सबसिडी दिली जाणार आहे. वाहनांसाठी दिल्या जाणाऱ्या सबसिडीची माहिती सुद्धा दिली गेली आहे. खालीलप्रमाणे..
* ई -2 डब्ल्यू (एल 1 आणि एल 2) जास्तीत जास्त सबसिडी 10,000 दिली जाणार आहे, जी 1,00,000 वाहनांसाठी दिली जाणार आहे.

* ई -3 डब्ल्यू ऑटो (एल 5 एम) जास्तीत जास्त 15,000 वाहनांसाठी, 30,000 सबसीडी दिली जाणार आहे.

* ई -3 डब्ल्यू माल वाहक वाहनांसाठी (L5N) 10,000 वाहनांसाठी, 30,000 सबसिडी दिली जाणार आहे

* ई -4 डब्ल्यू कार (एम 1) 10,000 वाहनांसाठी, 1,50,000 सबसिडी असणार आहे.

* ई -4 डब्ल्यू माल वाहक (एन 1) 10,000 वाहनांसाठी, 1,00,000 सबसिडी असणार आहे..

* सरकारी ई-बस च्या 10% वाहन किंमत 1,000 वाहनांसाठी 20,00,000 सबसिडी दिली जाणार आहे.