शबरी आदिवासी घरकुल योजना
Shabari awas
फहआदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फु. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देणे.
अ) ग्रामीण क्षेत्र - रु. 1.00 लाख
ब) नगरपरिषद क्षेत्र - रु. 1.50 लाख क) महानगरपालिका क्षेत्र - रु. 2.00 लाख
घराच्या बांधकामासाठी क्षेत्रनिहाय कमाल खर्चाची मर्यादा पुढील प्रमाणे आहे. अ) ग्रामीण साधारण क्षेत्र : रु. 1.32 लाख नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी : रु. 1.42 लाख ब) नगरपरिषद क्षेत्र : रु. 1.50 लाख क) महानगरपालिका क्षेत्र : रु. 2.00 लाख
1. अर्जदाराचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्टसाईज फोटो 2. जातीचे प्रमाणपत्र
3. रहिवासी प्रमाणपत्र
4. 7/12 उतारा व नमुना 8-अ
5. शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा दाखला
6. जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र
7. तहसिलदार यांचेकडून प्रमाणित उत्पन्नाचा दाखला
8. शासन वेळोवेळी विहित करतील अशी कागदपत्रे
9. ग्रामसभेचा ठराव