कृषी विभागाचा मोठा दणका; सातारा जिल्ह्यातील १२ कृषी सेवा केंद्रावर कारवाई. | Fertilizer rates

कृषी विभागाचा मोठा दणका; सातारा जिल्ह्यातील १२ कृषी सेवा केंद्रावर कारवाई.


खरीपाच्या पार्श्वभूमीवर खत विक्रेत्यांवर कृषि विभागाची कारवाई
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे.

यामध्ये युरिया खताच्या विक्रीत अनियमीतता केल्याचे निदर्शनास आल्याने तसेच जादा दराने डिएपी खताची विक्री केल्याने आणि खताची विक्री करताना पॉस मशिनचा वापर न करणे, पॉस मशिनवरील साठा व प्रत्यक्ष साठा, नोंदवहीतील साठा न जुळणे, शेतकऱ्यांना योग्य प्रकारे बिले न देणे अशे अनेक प्रकार उघडकीला आले आहेत.

यामुळे सातारा जिल्ह्यातील 11 दुकानांचे विक्री परवाने निलंबीत करण्यात आले आहेत तर  एका खत विक्रेत्याचा कायम स्वरुपी परवाना रद्द करण्यात आला आहे. 

अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

कृषी विभागाने केलेल्या या कारवाईमध्ये कराड तालुक्यातील 3, फलटण तालुक्यातील 2, दहिवडी 2, वाई 2, सातारा तालुक्यातील 1, पाटण 1 या खत विक्रेत्यांचा समावेश आहे.


पंचायत समितीस्तरावर व तालुका कृषि अधिकारी कार्यालयात निविष्टाबाबत तक्रार असल्यास ती नोंदविण्यासाठी तक्रार नोंदवही ठेवण्यात आली आहे. 

खरीप हंगामात कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी घ्यावयाच्या दक्षता, ठेवावयाचे अभिलेख यांचे मार्गदर्शन कृषी विभाग करत आहे. निविष्ठा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना योग्य सेवा न दिल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map