जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आता ऑफलाईन अर्ज | Caste Validity Offline Application form

 जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आता ऑफलाईन अर्ज 

Offline form for Cast validity 

Caste Validity Offline Application form
Caste Validity Offline Application form

राज्यात दिनांक १६ नोव्हेंबर २०२१ पासून शैक्षणिक कामासाठी जात पडताळणी अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विविध जिल्हयातून अर्जदार लोकप्रतिनिधी तसेच जात पडताळणी समिती कार्यालयाकडून ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज घेण्याबाबत  ( Caste Validity Offline Application form)  बार्टीकडे विनंती केलेली होती. 

सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश सुरु असून त्याकरिता उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची व जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल केलेल्या पावतीची आवश्यकता असते अशा या अर्जदारांची गैरसोय होऊ नये म्हणून बार्टी कडून ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

यातच जात पडताळणी समितीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीचा वेग मंदावला असल्यामुळे  विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन ( Caste Validity Offline Application form )अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील अशी माहिती पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) १७ नोव्हेंबर २०२१ रोजी एक  परिपत्रक काढून  देण्यात आली आहे.

दिनांक १७ ते २५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान जात पडताळणी चे अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. 

ऑफलाईन अर्ज फक्त शैक्षणिक कारणाकरिता स्वीकारण्यात येतील. तसेच अशा सूचना सर्व जातपडताळणी समित्यांनाही बार्टीमार्फत दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजीच्या परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत.

⃟ Caste Validity Offline Application form ⃟

👇👇

जात वैधता ऑफलाइन अर्ज pdf