काय आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजना || NFSM

शेतकऱ्यांना बी बियाणे खते निविष्ठा वर अनुदान देणारी महत्त्वाची योजना म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - national food safety mission 
केंद्र सरकार पुरस्कृत सन २००७-०८ पासून राज्यात अन्न सुरक्षा अभियान राबवले जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला शेतीच्या लागवडीसाठी आवश्यक असणारी बियाणे पुरविण्यात येते . 
बियाणे चांगल्या दर्जाचे असतील तर शेतीतून निघणारे उत्पन्न हि त्याच प्रतीचे निघते, त्यामुळे केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी हि योजना सुरू केली आहे.या योजनेत केंद्र सरकारने वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या पीक पध्दत्तीनुसार या योजनेसाठी पीकनिहाय जिल्हे निवडले आहेत,
यात

 भात – नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली (८ जिल्हे)

 गहू – सोलापूर, बीड, नागपूर (३ जिल्हे)

 कडधान्य – सर्व जिल्हे

 भरडधान्य (मका) -  सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे व जळगाव (एकूण ७ जिल्हे).

पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) –  ज्वारी, बाजरी, रागी ( २६ जिल्हे)

* ज्वारी – नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ (एकूण २३ जिल्हे)
* बाजरी – नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद (एकूण ११ जिल्हे)
*  रागी – नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे (पालघर सह), रायगड व रत्नागिरी. (एकूण ७ जिल्हे)

कापूस-  बुलढाणा,अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा,नागपूर,चंद्रपूर.

 ऊस-  औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,उस्मानाबाद,नांदेड,परभणी,हिंगोली.

लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे असतील :

  • शेतीचा ७/१२ प्रमाणपत्र
  • शेतीचे ८-ए प्रमाणपत्र
  • खरेदी करण्याचे साधन / उपकरणांचे कोटेशन (पंप, पाईप, शेततळे या घटकांकरीता)
  • केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र (पंप घटकासाठी)
  • शेतकरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती असल्यास जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • शेतकऱ्याकडून हमीपत्र
  • खरेदी करण्यापूर्वीच पूर्वसंमती पत्र.