NCMC Card - १ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक NCMC Card Rule मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवेमध्ये पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी याचबरोबर डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अर्थात एनसीएमसी कार्ड ( NCMC Card ) आणण्यात आलेला आहे. यापूर्वी परिवहन विभागाच्या माध्यमातून हे कार्ड प्रवाशांसाठी बंधनकारक करण्यात आलं होतं मात्र झालेल्या मोठ्या विरोधामुळे हा निर्णय मागे घेण्यात आलेला होता, आणि अखेर आता राज्यातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक या प्रवासासाठी हे कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये दिल्या जाणाऱ्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिला जेष्ठ नागरिक व अमृत जेष्ठ नागरिक यांनी एक ऑगस्ट 2026 पूर्वी एनसीएमसी कार्ड बनवावं अशा प्रकारचं आव्हान करण्यात आला आहे. राज्यात आज अखेरपर्यंत 51 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड साठी नोंदणी केलेली असून त्यापैकी 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्...