सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना योजनेसाठी अर्ज सुरु | Poultry Development blocks application 2023
सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना योजनेसाठी अर्ज सुरु Poultry Development blocks application 2023 Poultry Development Group application 2023 राज्यातील 302 तालुक्यामध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे या योजनेसाठी जिल्हास्तरीय समितीने योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्राधान्यक्रमाने सन 2022 - 23 करीता बुलढाणा जिल्ह्यात सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे ही योजना राबविण्यात येत आहे. परसातील कुक्कुट पालनास चालना देण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापन करण्याच्या या योजने अंतर्गत सन 2022-2023 करिता बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा आणि मेहकर या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. तालुक्यांमधून प्रति तालूका 1 या प्रमाणे लाभार्थीची निवड करावयाची आहे. या योजनेसाठी अर्ज करणेचा कालावधी हा दिनांक २८ डिसेंबर २०२२ ते १० जानेवारी २०२३ असून इच्छूक लाभार्थीनी परिपूर्ण अर्ज भरुन संबंधित पंचायत समिती, पशुसंवर्धन विभागाकडे दि. १० जानेवारी २०२३ अ...